नाशिक : टाळमृदुंगाचा गजर, रंगफुलांची उधळण यांसह हजारो वारकऱ्यांच्या उत्साहात संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. वारकऱ्यांमध्ये विशेष महत्त्व असलेली संत निवृत्तीनाथ यात्रेस सुरूवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा 500 हुन अधिक दिंड्या, तर 3 लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्यावतीने यात्रेचे नियोजन पूर्ण झाले आहे. संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रिम सभा मंडप, कृत्रिम दर्शन बारीचे उभारणी आली आहे. त्याचबरोबर यंदाची वारी निर्मल वारी होण्यासाठी प्रशासनासह देवस्थान प्रशासन प्रयत्न करत आहेत.
कृत्रिम सभामंडपाची सोय : येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव होत आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजने अंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मंदिर परिसरातील मुख्य सभागृह सभा मंडप पाडण्यात आले असल्याने या ठिकाणी कृत्रिम सभामंडप तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्य सभामंडप बाजूलाच कृत्रिम दर्शन बारीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन बारी वरही मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्सव काळात देवस्थान परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिरा लाल गालीचा वापर करण्यात आला आहे.पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले : श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर परिसरात 30 हुन अधिक सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानाचे दिंड्या येतात. त्यामुळे वारकऱ्यांची गर्दी होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर दाखल होणाऱ्या दिंड्याचे सभामंडपात स्वागत करत त्यांच्या निवासासाठी राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. तर दोन वर्षे कोव्हिडमुळे वारकरी ,भाविक दिंडी त्रंबकेश्वरला आले नव्हते. आता टाळ मृदंगाच्या निनादाने आणि वारकऱ्यांच्या आगमनाने दिंड्याच्या हरी नामाने मनाला प्रसन्न वाटत आहे. भागवत धर्माचा वारकरी संप्रदायाचा सोहळा पाहून मनात चैतन्य निर्माण होते अशी , प्रतिक्रिया ब्रह्मदर्श आश्रमाचे महंत रामानंद सरस्वती यांनी दिली.
जादा बसेसचे नियोजन : श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्रंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहेत. पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वर मध्ये दाखवल होत आहेत. हजारो भाविक त्रंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत. भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिटी लिंकच्या वतीने तपोवन आगारातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेऱ्या त्रंबकेश्वर साठी ,तर नाशिक रोड आगारातून 10 बसच्या माध्यमातून 60 फेऱ्या त्र्यंबकेश्वर साठी सोडण्यात आले आहे. या नियमित बस सेवा बस व्यतिरिक्त त्रंबकेश्वर यात्रा उत्सवानिमित्त तपोवन आग्रहातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 बस फेऱ्या, नाशिकरोड आगारातून 4 बसेसच्या वर्षाच्या माध्यमातून 32 अशा एकूण 10 ज्यादा बसेसच्या माध्यमातून 80 बस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. 18 जानेवारी व 19 जानेवारी असे दोन दिवस ज्यादा वर्षाचे नियोजन करण्यात आले आहेत. 18 व 19 जानेवारी रोजी तपोवन आगारातून 21 बसेसच्या माध्यमातून 154 बस फेऱ्या तर नाशिक रोड आगारातून 92 बस फेऱ्या नियोजित आहेत. एकूणच दोन दिवसात रोज 246 बस फेऱ्या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर या मार्गावर कार्यात असणार आहे. यात्रेच्या काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सिटीलींकच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.