ETV Bharat / state

मद्य विक्रीसाठी परवानगी मग आम्हाला का नाही..?, छोट्या व्यावसायिकांचा सवाल

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून, शहरात आतापर्यंत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पहिले दोन रुग्ण आल्यानंतर प्रशासनाने अत्यंत काळजी घेत चार दिवस शहर कडकडीत बंद ठेवले होते.

manmad
मद्य विक्रीसाठी परवानगी मग आम्हाला का नाही?.. छोट्या व्यावसायिकांचा सवाल
author img

By

Published : May 19, 2020, 5:23 PM IST

नाशिक - मनमाड शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी हातावर पोट असलेले अनेक लहान व्यावसायिक देशोधडीला लागले असून, अशा अत्यंत गरजेच्या लहान व्यावसायिकांनी मागणी करूनही दुकाने उघडण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र, राज्य उत्पादक शुल्क अधिकारी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याने मनमाड शहरातील १५ दारू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने सर्वत्र नाराजीचा सुरू उमटत आहे. दारू दुकाने सुरू करायची होती मग छोट्या दुकानदारांनीच काय केले? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.

मद्य विक्रीसाठी परवानगी मग आम्हाला का नाही?.. छोट्या व्यावसायिकांचा सवाल

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून, शहरात आतापर्यंत सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पहिले दोन रुग्ण आल्यानंतर प्रशासनाने अत्यंत काळजी घेत चार दिवस शहर कडकडीत बंद ठेवले होते. मात्र, नंतर पॉझिटिव्ह रुग्ण आल्यावरही पाहिजे तशी काळजी घेण्यात आली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानून रुग्ण आढळलेले ठिकाण सोडून शहरात सोमवार ते शनिवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा, मेडिकल, आदींना मोकळीक देण्यात आली. मात्र, शहरातील अनेक छोटे व्यवसाय बंद असल्याने ते देशोधडीला लागले आहे. सलून, गॅरेज, बॅटरी दुकाने, मोबाईल रिपेअरिंग, इस्त्री, हार्डवेअर, नळ फिटिंग, हातगाडे, चप्पल दुरुस्ती दुकान, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल दुकान, भेळ, चणे फुटाणे, कपडे यासारखे इतर हातावर पोट भरणाऱ्या अनेकांनी शहरातील काही दुकाने वेळेत सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.

छोटे व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून न घेता जिल्हाधिकारी यांनी शहरातील कंन्टेटमेंट झोन सोडू,न १५ दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली असल्याचे छोटे व्यावसायिक म्हणत आहेत. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मद्यविक्रीला वेळ देण्यात आली आहे. दूध विक्रेत्यांना केवळ तीन तास तर दारू दुकानांना ६ तास दिल्याने मनमाडकरांनी संताप व्यक्त केला आहे. उपासमार होत असल्याने काही दुकानदारांनी लपूनछपून दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे दारू दुकाने उघडण्याऐवजी आशा छोट्या व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली असती तर त्यांनी सुरक्षीत अंतर पाळत आपल्या पोटाची खळगी भरली असती. छोटे व्यावसायिक म्हणत आहेत.

शहरातील मद्यविक्री करण्यास परवानगी दिली. मात्र, छोट्यामोठ्या व्यवसायिकांना का परवानगी नाकारली जात आहे? असा सवाल व्यवसायिक विचारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.