ETV Bharat / state

नाशिक: मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी शिवसेना आक्रमक

पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये निशुल्क वाहनतळ व्यवस्था करावी, यासाठी नाशिकमधील शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

author img

By

Published : Jun 20, 2019, 4:56 PM IST

नाशिक: मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी शिवसेना नगरसेवक आक्रमक

नाशिक - पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये निशुल्क वाहनतळ व्यवस्था करावी, यासाठी नाशिकमधील शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आजच्या महासभेत नगरसेवकांनी मॉलमध्ये वाहनतळ व्यवस्था करण्याची मागणी केली. मात्र, महासभा तहकूब झाल्याने नगरसेवकांनी सभागृहातच फलक झळकावून निदर्शने केली. त्यामुळे पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही निशुल्क पार्किंगचा विषय चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक: मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी शिवसेना नगरसेवक आक्रमक

व्यावसायिक दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना वाहनतळाची सुविधा देणे, अभिप्रेत असते. परंतु, शहरातील मॉलधारक ग्राहकांकडून दुचाकीला 20 तर चार चाकीचाकीसाठी 30 ते 40 रुपयांची आकारणी केली जाते. या माध्यमातून सामान्य ग्राहकांची मोठी लूट होत, असल्याचा मुद्दा मांडत नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील सर्व मॉलमध्ये वाहनतळाची सुविधा मोफत करावी, असा प्रस्ताव आजच्या महासभेत मांडला. मात्र, महापौरांनी आचारसंहितेचे कारण देत आजची सभा तहकूब केली. त्यामुळे शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सभागृहात गोंधळ घातला. तसेच येत्या 15 दिवसात यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शहराच्या महापौर रंजना भानसी यांनी आचारसंहिता संपताच शहरातील मॉल मधील पार्किंगच्या शुल्काबाबत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Intro:पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये निशुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी नाशिकमधील शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेय आज झालेल्या महासभेत हा विषय मंजूर करण्यासाठी मागणी होती मात्र महासभा तहकूब झाल्याने या नगरसेवकांनी सभागृहातच फलक फडकवत निदर्शने केले यामुळे आता पुण्या पाठोपाठ नाशिक मध्येहि निशुल्क पार्किंगचा विषय चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय

Body:व्यवसायिक दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना वाहनतळाची सुविधा देणे अभिप्रेत असते परंतु शहरातील मॉल धारक ग्राहकांकडून दुचाकीला 20 तर चार चाकीचाकी मोटर सायकल साठी 30 ते 40 रुपयांची आकारणी करतात या माध्यमातून सामान्य ग्राहकांची मोठी लूट होत असल्याचा मुद्दा मांडत नाशिक मधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील सर्व मॉल्समध्ये वाहनतळाची सुविधा मोफत करावी असा प्रस्ताव आजच्या महासभेत मांडला मात्र महापौरांनी आचारसंहितेचे कारण देत आजची सभा तहकूब केली शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सभागृहात गोंधळ घातला येत्या पंधरा दिवसात यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या नगरसेवकांना दिला आहे

Conclusion:शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शहराच्या महापौर रंजना भानसी यानी आचारसंहिता संपताच शहरातील मॉल मधील पार्किंगच्या शुल्काबाबत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे
पुण्यापाठोपाठ आता नाशिक मधील पार्किंग शुल्काचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पालिका प्रशासन या मॉल मधील पार्किंग शुल्क वर काय तोडगा काढणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे या वादानंतर आता पुण्यापाठोपाठ नाशिक मधील मॉल मध्ये घेण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्क भरण्यावरून वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.