नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वणी येथील महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिवभोजन थाळीचे उद्घाटन नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवभोजन थाळी हा उपक्रम, म्हणजे गोर गरीब, काबाड कष्ट, मजूर यांच्यासाठी मोठा आधार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
यावेळी दिंडोरी कृउबा समिती सभापती दत्तात्रय पाटील म्हणाले की, महाराष्ट शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सध्याच्या काळात गोर गरीब जनतेला या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांनी १० रुपयाऐवजी केवळ ५ रुपयात थाळी सुरू केल्याने गरिबांना आपले पोट भरण्यास आधार मिळाला आहे.
या प्रसंगी आमदार नरहरी झिरवाळ, बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, जि.प. सदस्य भास्कर भगरे, माजी सदस्य विलास कड, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव हिरे, मधुकर भरसट, मनोज शर्मा, शरद महाले, छबुराव मटाले, दत्तात्रय चव्हाण, तौसिफ मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- नाशिकमध्ये पेंटींगच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत जनजागृती