नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांनी केलेल्या वाटचालीवर सर्व जनतेपर्यंत विकासकार्य पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
रविवारी शिवराज्यभिषेक दिन सोहळा जिल्हा परिषदेत साजरा झाला आहे. इमारतीच्या प्रागंणातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच पुतळ्या शेजारी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी सामूहिक महाराष्ट्र दिन आणि राष्ट्रगीताचे पठणही यावेळी करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून आजचा शिवराज्यभिषेक दिन हा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे क्षीरसागर म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.