ETV Bharat / state

नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचे रूप बदलवले; माजी विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम - निफाड तालुक्यातील शिरवाडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

"घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती"  या काव्यपंक्तीप्रमाणे निफाड तालुक्यातील शिरवाडे गावातील प्राथमिक शाळेच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून स्वखर्चाने रंगकाम केले आहे. हे रंगकाम चित्रकलेचा अद्भुत नमुना म्हणून परिसराचे आकर्षण ठरले आहे.

निफाड तालुक्यातील शिरवाडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
author img

By

Published : Nov 3, 2019, 7:20 PM IST

नाशिक - "घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती" या काव्यपंक्तीप्रमाणे निफाड तालुक्यातील शिरवाडे गावातील प्राथमिक शाळेच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून स्वखर्चाने रंगकाम केले आहे. हे रंगकाम चित्रकलेचा अद्भुत नमुना म्हणून परिसराचे आकर्षण ठरले आहे.

हेही वाचा - लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण फक्त अपंग, निराधार, वृद्धांनाच; कोल्हापुरातील अनोखा उपक्रम

व्हॉट्सअॅपवर चर्चिल्या जाणाऱ्या आठवणी, शाळेतील धमाल, मित्रांसह केलेला दंगा या आठवणीतून बाहेर पडून या शाळेत शिक्षण घेऊन बाहेर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेचे रुप पालटून टाकले. वय, नोकरीचे क्षेत्र, धकाधकीचे जीवन या सगळ्याच सीमा ओलांडत अवघ्या काही दिवसात शाळेच्या रंगकामासाठी लाखभर रुपये त्यांनी जमा केले होते.

निफाड तालुक्यातील शिरवाडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची १९६८ मध्ये बांधलेली इमारत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. भिंतींचे रंग आणि पोपडेही त्याच जुनाट अवस्थेत होते. येथील बाबासाहेब आवारे यांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आपल्या बाहेरगावी असणाऱ्या चाकरमानी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळेच्या रंगकामासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकांत आवारे यांनी तातडीने मुख्यध्यापकांच्या खात्यावर १० हजार रुपये मदतनिधी जमा केला. सर्व सदस्यांनीही आपापल्या यथाशक्ती दिलेल्या निधीतून शाळेला रंगीत बनवायचे ठरविले.

त्यानुसार शाळेचे पूर्ण रूप बदलून गेले आहे. रंगविरहित भिंतीची जागा बालमनाचे आकर्षण असलेले मोटू, पतलु, सुविचार, नकाशे, किल्ला, बाराखडीने घेतली. त्यामुळे कालपर्यंत निरस वाटणाऱ्या शाळेच्या भिंतीसुद्धा अक्षरश: बोलू लागल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांची पाऊलेही आपोआप शाळेकडे वळू लागली आहेत. सध्या इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले आहे मात्र या मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योगपती झाले आहेत. त्यामुळे शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही उपक्रम हाती घेतले असून माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्याची कल्पना असल्याचे माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत आवारे म्हणाले.

शाळेच्या रंगकामाच्या उपक्रमासाठी निफाडचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, वाळीबा कदम, डॉ.श्रीकांत आवारे, शशिकांत चिताळकर, नरेंद्र आवारे, सर्जेराव शिंदे, संजय सांगळे, बाळासाहेब आवारे, बाबासाहेब आवारे, संदिप आवारे, ज्ञानेश्वर काळे, अजय आवारे, ज्ञानेश्वर आवारे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव आवारे, नानासाहेब धनराव, आण्णासाहेब आवारे, गोकुळ आवारे, प्रविण धनराव, संदिप पालवी, विशाल आवारे, किरण काकड, गणेश काकड, रविंद्र शिंदे, किशोर शिंदे, सचिन आवारे, ज्ञानेश्वर थोरात, किरण थोरात, बद्रिनाथ आवारे, नकुल आवारे, अमित आवारे, संतोष धनराव, मेघराज धनराव आदींनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे शाळेचे शिक्षक म्हणाले.

हेही वाचा - एक दिवसाचा मुख्यमंत्री होणार का? वाचा काय म्हणाले अनिल कपूर

Intro:या घरट्यातून पिल्लू उडावे
दिव्य घेऊनी शक्ती,
आकांक्षाचे पंख असावे,
उंबरठ्यावर भक्ती."
या काव्यपंक्तीप्रमाणे शिरवाडेच्या प्राथमिक शाळेच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून स्वखर्चाने रंगकाम केले असून हे रंगकाम चित्रकलेचा अद्भुत नमुना म्हणून परिसराचे आकर्षण ठरले आहे.Body:व्हाट्सअप ग्रुपवर चर्चिल्या जाणाऱ्या आठवणी,शाळेतील धमाल,मित्रांसह केलेला दंगा या आठवणीतून बाहेर पडून प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन बाहेर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वय,नोकरीचे क्षेत्र,धकाधकीचे जीवन या सगळ्याच सीमा ओलांडत अवघ्या काही दिवसात शाळेच्या रंगकामासाठी लाखभर रुपये जमा केले आणि त्या रकमेतून शाळेचे रुपच पालटले.
येथील जि.प.प्राथमिक शाळेची सन १९६८ मध्ये बांधलेली इमारत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.भिंतींचे रंग आणि पोफडेही त्याच जुनाट अवस्थेत होते.येथील बाबासाहेब आवारे यांनी शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आपल्या बाहेरगावी असणाऱ्या चाकरमानी मित्रांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळेच्या रंगकामासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते व मदतिसाठी हि माजी विद्यार्थी शाळे प्रति धावून आले.Conclusion:निफाड तालुक्यातील शिरवाडे शाळेतील विध्यार्थ्यांनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकत सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रीकांत आवारे यांनी तातडीने मुख्यध्यापकांच्या खात्यावर १० हजार रु.मदतनिधी जमा केला.सर्व सदस्यांनीही आपापल्या यथाशक्ती दिलेल्या निधीतून शाळेला रंगीत बनवायचे ठरविले.आणि ते प्रत्यक्षात उतरविलेही.आज शाळेचं पुर्ण रुपडं बदलुन गेलयं.रंगविरहीत भिंतीची जागा बालमनाचे आकर्षण असलेले मोटू,पतलु,सुविचार,नकाशे,किल्ला,बाराखडीने घेतली.त्यामुळे कालपर्यंत निरस वाटणा-या शाळेच्या भिंतीसुद्धा अक्षरश: बोलु लागल्या आणि विद्यार्थ्यांची पाऊलेही आपोआप शाळेकडे वळू लागलीत.
या कामासाठी निफाडचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.डी.थोरात,वाळीबा कदम,डॉ.श्रीकांत आवारे,शशिकांत चिताळकर,नरेंद्र आवारे,सर्जेराव शिंदे,संजय सांगळे,बाळासाहेब आवारे,बाबासाहेब आवारे,संदिप आवारे,ज्ञानेश्वर काळे,अजय आवारे,ज्ञानेश्वर आवारे,ज्ञानेश्वर शिंदे,सदाशिव आवारे,नानासाहेब धनराव,आण्णासाहेब आवारे,साठे साहेब,गोकुळ आवारे,प्रविण धनराव,संदिप पालवी,विशाल आवारे,किरण काकड,गणेश काकड,रविंद्र शिंदे,किशोर शिंदे,सचिन आवारे,ज्ञानेश्वर थोरात,किरण थोरात,बद्रिनाथ आवारे,नकुल आवारे,अमित आवारे,संतोष धनराव,मेघराज धनराव आदींनी मोलाचे सहकार्य केले.
-------------------
सध्या इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले आहे मात्र या मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज डॉक्टर,इंजिनियर,वकील,उद्योगपती झाले आहे त्यामुळे शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही उपक्रम हाती घेतले असून भविष्यात ओळखपत्र,माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्याचे नियोजन आहे.
डॉ.श्रीकांत आवारे
माजी विद्यार्थी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.