ETV Bharat / state

ऑनलाइन शिक्षण प्रणालीस शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा विरोध - ऑनलाइन शिक्षण

मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या मुलांचे होणारे शारीरिक नुकसान कोण भरून काढणार? तसेच ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा अभ्यास नसून फक्त अभ्यासाचा आभास असल्याचे मत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे नाशिक कार्यकारी अध्यक्ष मुकंद दीक्षित यांनी व्यक्त केले.

nashik latest news  online education system  online education starts  ऑनलाइन शिक्षण  ऑनलाइन शिक्षण विरोध
ऑनलाइन शिक्षण प्रणाली
author img

By

Published : Jun 15, 2020, 5:59 PM IST

नाशिक - राज्यात आजपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीला नाशिकच्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने विरोध केला आहे. मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या मुलांचे होणारे शारीरिक नुकसान कोण भरून देणार? असा सवाल देखील शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने केला आहे.

ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक नुकसान, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा विरोध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार की नाही? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. शाळा सुरू झाल्या, तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आणि शाळा सुरू करण्यास उशीर झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. यामुळे त्या दोन्ही बाजूंचा विचार करत शासनाच्या वतीने ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आजपासून या नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. मात्र, नाशिकच्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने या ऑनलाइन शिक्षण प्रणालीला विरोध करण्यात आला आहे. मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या मुलांचे होणारे शारीरिक नुकसान कोण भरून काढणार? तसेच ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा अभ्यास नसून फक्त अभ्यासाचा आभास असल्याचे मत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे नाशिक कार्यकारी अध्यक्ष मुकंद दीक्षित यांनी व्यक्त केले.

शिक्षण संस्थाचालकांचे दुकान सुरू राहावे, यासाठीच ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली असल्याचा आरोप या मंचच्या पदाधिकारी वासंती दीक्षित यांनी केला आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शैक्षणिक वर्ष आणि कोरोनाचा प्रादुर्भाव याचा समन्वय साधत शासनाच्यावतीने ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र, ऑनलाइन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे त्याचा विरोध केला जात असल्याचे दीक्षित म्हणाले. यावर शासन नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.