नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. मात्र, आतापर्यंत ते आमनेसामने आले नव्हते. पण आज नाशिकमध्ये पहिल्यांदाच ते समोरासमोर येत आहेत.
हेही वाचा - दहा-पाच रुपयात जेवण द्यायला महाराष्ट्र भिकेला लागला आहे का, राज ठाकरेंचा सेना-भाजपवर घणाघात
आज सकाळी शरद पवार यांची 11 वाजता सटाणा, दुपारी 2 वाजता पिंपळगाव निफाड तर दुपारी 3.30 वाजता नांदगाव येथे सभा होणार आहे. सांयकाळी 6 वाजता नाशिक पुर्व मतदारसंघात तर रात्री 8 वाजत नाशिक पश्चिम मतादारसंघामध्ये पवार यांच्या सभा होणार आहेत.
हेही वाचा - नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेना नगरसेवकांचे राजीनामा नाट्य?
नाशिक पूर्वचे भाजप उमेदवार अॅड. राहुल ढिकलेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सायकांळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. तर त्याच वेळी बाळासाहेब सानप यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे शहरात हे दोन्ही नेते समोरासमोर येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले.