ETV Bharat / state

माझ्या घराची चिंता करण्याऐवजी मोदींनी शेतकऱ्यांची चिंता करावी - पवार - दिंडोरी

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपच्या डॉ. भारती पवार आणि मार्क्सवादी पक्षाचे जीवा पांडू गावीत यांचे आव्हान आहे. त्यामुळे दिंडोरीची निवडणूक तिरंग होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

शरद पवार
author img

By

Published : Apr 22, 2019, 8:52 AM IST

नाशिक - नवीन भारत उभा करण्यासाठी गांधी घराण्याने बलिदान दिले. आजही गांधी कुटुंब मागे न हटता देशासाठी योगदान देत आहे. पण, भाजप त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्याचे काम करीत असून, आता पुढचा हल्ला माझ्यावर करतील. नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी नांदगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, की माझ्या घरावर व्यक्तिगत हल्ले करण्याऐवजी मोदी यांनी देशातील शेतकरी शेतमजूर कामगारांची चिंता करावी. माझ्या घराण्याची चिंता करणाऱ्या मोदी यांनी स्वतःच्या घराची चिंता करावी. पाच वर्षांचा कालखंड कसा गेला, काय विकास केला ते सांगावे. मोदी देशोदेशी फिरले मात्र, विकासाचे मॉडेल कुठेच उभे केले नाही, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.

निवडणुकीच्या कामातून मोकळा झाल्यावर माझ्याकडे या आपण नारपारचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले. त्यापूर्वी याविषयी माजी आमदार अनिल आहेर, आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावला पाणी मिळावे अशी मागणी केली होती. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपच्या डॉ. भारती पवार आणि मार्क्सवादी पक्षाचे जीवा पांडू गावीत यांचे आव्हान आहे. त्यामुळे दिंडोरीची निवडणूक तिरंग होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

Intro:नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने बलिदान दिले आजही राहुल गांधी कुटुंब मागे न हटता देशासाठी योगदान देत आहे भाजपा ठिकाणी व्यक्तिगत हल्ले करण्याचे काम करीत असून आता पुढचा हल्ला माझ्यावर करतील नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

Body:दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते पवार म्हणाले की माझ्या घरांवर व्यक्तिगत हल्ले करण्याऐवजी मोदी यांनी देशातील शेतकरी शेतमजूर कामगारांची चिंता करावी माझ्या घराण्याची चिंता करणाऱ्या मोदी यांनी स्वतःच्या घराची चिंता करावी पाच वर्षाचा कालखंड कसा गेला काय विकास केला ते सांगावं देशोदेशी फिरले मात्र विकासाचे मॉडेल कुठेच उभे केले नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला

Conclusion:नारपार चा प्रश्न सोडवू:-
निवडणुकीच्या कामातून मोकळा झाल्यावर माझ्याकडे या आपण नारपार चा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू असा शब्द नांदगावकरांना शरद पवार यांनी दिला त्यापूर्वी याविषयी माजी आमदार अनिल आहेर आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावला पाणी मिळावे असे साकडे घातले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.