ETV Bharat / state

Sesame Rate Increased अवकाळी पावसाचा तिळाला फटका ; मकर संक्रातीच्या तोंडावर बाजारात तिळाचे भाव वाढले

अवकाळी पावासामुळे तिळाच्या ( Sesame Rate Increased In The Market ) दरावर चांगलेच परिणाम झाले आहेत. मकर संक्रातीचा सण जवळ येत असताना बाजारात तिळाचे ( Makar Sankranti Festival ) दर चांगलेच वाढले आहेत. अजूनही तिळाचे दर 5 ते 7 रुपयाने वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाजारात तीळ खरेदीसाठी ग्राहकांची ( Heavy Rain Affected Sesame Rate ) गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Sesame Rate Increased At Nashik
मकर संक्रातीच्या तोंडावर बाजारात तिळाचे भाव वाढले
author img

By

Published : Jan 4, 2023, 4:29 PM IST

Updated : Jan 12, 2023, 10:57 AM IST

नाशिक - अवकाळी पावसामुळे तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात तिळाचे ( Sesame Rate Increased In The Market ) भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 180 रुपये किलो दराने मिळणारे तीळ आता 240 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. अशात मकर संक्रांतीचा सण ( Makar Sankranti Festival ) जवळ येत असल्याने तिळाच्या दरात अजूनही 5 ते 7 रुपये वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये गुजरातमधून सर्वाधिक तिळाची आवक होते. मात्र सध्या तिथेच मालाची कमतरता असल्याने तिळाच्या दरावर ( Heavy Rain Affected Sesame Rate ) परिणाम झाले आहेत. आणखी दर वाढण्यापूर्वीच या वस्तूंची खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे असल्यामुळे तीळ खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

मकर संक्रातीच्या तोंडावर बाजारात तिळाचे भाव वाढले

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तिळाकडे पाठ नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात एकेकाळी तिळाची चांगली लागवड होत होती. पण या भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वाळल्याने तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी इतर शहर, राज्यातून तीळ मागवावा लागतो. त्यामुळे साहजिक वाहतूक खर्च वाढत असल्याने तिळाच्या दरात वाढ होत आहे.

या भागातून येतो तिळ नाशिकमध्ये काही प्रमाणात मध्य प्रदेशातून तर जास्त प्रमाणात गुजरातमधून तिळाची आवक होते. यावर्षी अवकाळी पावसाळ्यामुळे तीळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तिळाचे भाव 140 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलेत.

तिळाचे भाव अजून वाढतील अवकाळी पावसामुळे यंदा 40 टक्के तिळाचे पीक खराब झाले. त्यामुळे केवळ 60 टक्के तिळ बाजारात उपलब्ध आहेत. संक्रातीच्या काळात तिळाच्या दरात किमान पाच ते सात रुपये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुळाच्या दरावर मात्र संक्रांतीचा फारसा परिणाम होत नाही. यामुळे गुळाचे दर फारसे वाढणार नाहीत असे होलसेल व्यापारी भूषण संचेती यांनी सांगितले.

गुळाचे भावही काही प्रमाणात वाढेल तिळाबरोबरच गुळाचे दरही थोड्या प्रमाणात वाढले असून 70 ते 80 रुपये किलो या दराने सेंद्रिय गुळ मिळत आहे. तर विविध नामांकित कंपन्यांच्या गूळ पावडरचा दर हा 120 रुपये पासून 140 रुपये किलोपर्यंत आहे.

तिळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मकर संक्रांतीला तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व असते. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात यावा म्हणून या दोन वस्तूंपासून बनलेल्या पदार्थाची देवाण-घेवाण करण्याची परंपरा आहे. थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता प्राप्त करुन देतात.

Last Updated : Jan 12, 2023, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.