नाशिक - शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे शनिवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत कल्पना पांडे चार वेळा निवडणून आल्या होत्या.
सेवाभावी लोकप्रतिनिधी हरपल्या - भुजबळ
शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांना पालकमंत्री छगन भुजबळांनी श्रद्धांजली वाहिली. भुजबळ म्हणाले, की नाशिक महानगरपालिकेत सलग चार वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी विविध लोकउपयोगी कामे केली. प्रभाग सभापती तसेच विविध समित्यांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांच्या निधनाने सेवाभावी लोकप्रतिनिधी काळाच्या पडदयाआड गेला आहे. त्यांच्या अकाली निधनाने पांडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय पांडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना त्यांनी व्यक्त केली आहे.