नाशिक - गेल्या आठवड्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी लाखो रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला होता. हा जप्त केलेला मद्यसाठा नाशिक आणि जिल्ह्यातिल वेग वेगळ्या वाइन शॉपवर विक्री केला जात असल्याचे तपासात समोर आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अतुल मदन या एकाच व्यक्तीशी संबंधित तब्बल 14 वाईन शॉप सील केले आहेत. या धडाकेबाज कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाने गेल्या आठवड्यात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांचा अवैद्य मद्यसाठा जप्त केला होता. हा जप्त करण्यात आलेला अवैध मद्यसाठा नाशिकमधील वेगवेगळ्या वाईन शॉपवर विकण्यासाठी जात होता. मात्र, या सर्व वाईन शॉपचा एकाच व्यक्तीशी संबध असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने पोलीसही अवाक् झाले होते.
नाशिक जिल्ह्यात देशी आणि विदेशी दारू अवैधपणे आणून ती विक्री करणारा मास्टरमाइंड अतुल मदन याचे कारनामे समोर आल्याने नाशिक उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अतुल मदन आणि त्याच्या संबधित असलेले जिल्ह्यातील तब्बल १४ वाईन शॉप सील केले आहेत.
अतुल मदन याला अटक होणार?-
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईनंतर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईने अवैध दारू वाहतूक करणारे आणि विक्री करणाऱ्या टोळीचे धाबे दणानले आहे. या अवैध मद्यवाहतूक आणि विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल मदन याच्यावरच कारवाई केल्याने सामान्यांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, या प्रकरणातला मुख्य सूत्रधार अतुल मदन याला अटक होणार, की राजकीय दबावात त्याला अभय मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई: 'केंद्रीय संस्थांचा राजकीय द्वेषासाठी गैरवापर'