ETV Bharat / state

Satyajeet Tambe Allegation on Congress : काँग्रेस कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले; सत्यजित तांबेंचा आरोप

कॉंग्रेस कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. बाळासाहेब थोरात आणि आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर तसेच जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचले गेले होते, असा गंभीर आरोप आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह प्रदेश कॉंग्रेसवर टीका केली आहे.

Satyajeet Tambe Press Conference
सत्यजित तांबे
author img

By

Published : Feb 4, 2023, 8:22 PM IST

Updated : Feb 4, 2023, 9:17 PM IST

सत्यजित तांबे पत्रकार परिषदेत बोलताना

नाशिक : पदवीधर मतदार संघाच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कॉंग्रेसवर आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. माझा स्पष्टपणे आरोप आहे, की बाळासाहेब थोरात आणि आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर तसेच जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचले गेले.

सत्यजीत तांबेंचा गंभीर आरोप : कॉंग्रेसने आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याची स्क्रिप्ट तयार केली. त्याचा स्क्रिप्टचा पार्ट म्हणून माझ्या माणसाला बोलावले. दहा-बारा तास बसवून ठेवले. बंद पाकिटात फॉर्म दिले. ते फॉर्म चुकीचे दिले, असा गंभीर आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे आपले मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र होते, असा गंभीर आरोप देखील सत्यजीत तांबे यांनी केला. त्यामुळे आता काँग्रेस पक्षामध्ये मोठी धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीतून नाव आले : ते पुढे म्हणाले की, मला आता असे सांगत आहेत की, निर्णय तुम्हाला घ्यायचा होता की, कोण उभे राहणार? मग बरोबर साडेबारा वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली? महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून आले नाही. मग एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली? असे प्रश्न सत्यजित तांबे यांनी उपस्थित केले.

सत्यजीत तांबे काय म्हणाले? : सत्यजीत तांबे पत्रकार परिषदेत म्हणाले की, एका बाजूला मला पक्ष संधी देऊ शकत नाही. संघटना संधी देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटले की, तुझा पक्ष आणि संघटना तुला संधी देऊ शकत नसेल तर मीच काहीतरी केले पाहिजे. एक पित्याची भूमिका म्हणून त्यांनी मला निवडणुकीच्या 15 दिवस आधी फॉर्म जाहीर झाल्यानंतर सांगितले की, सत्यजित मला असे वाटते की ही निवडणूक तू लढायला पाहिजे. मला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सांगितले, असे ते म्हणाले होते. पण मला वडिलांच्या जागेवर उभे राहायचे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चर्चा केली. नंतर आम्ही आमच्या घरामध्ये चर्चा केली.

उमेदवारीबाबत काय सांगितले : ते पुढे म्हणाले की, आमच्या घरात उमेदवारीच्या चर्चे दरम्यान थोरात साहेब होते तसेच माझे वडील होते. मी निवडणूक लढवावी असे चर्चा झाल्यानंतर ठरले. आम्ही आम्ही तशा पद्धतीचे निर्णय पक्षाला कळवला. फक्त माझी मानसिकता पूर्णपणे तयार झालेली नव्हती. त्यामुळे डॉक्टर लढतील की सत्यजीत लढेल हे आपण शेवटच्या वेळी ठरवूयात. तोपर्यंत आपण कुणाची उमेदवारी जाहीर करु नका, असे मी स्वत: एच के पाटील यांना सांगितले.

दोन चुकीचे एबी फॉर्म पाठवले : सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही प्रदेश कार्यालयाला 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून कॉल केला. त्यानुसार 10 तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो बसून राहिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवत आहे. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते. 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडले तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचे समोर आले, असा आरोप त्यांनी नाना पटोलेंवर केला आहे.

सत्यजीत तांबेंची भूमिका स्पष्ट : ते पुढे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते. एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचे कळले. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयाने गहाळपणे का करावा? विशेष म्हणजे या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षांची सही आहे. मी तातडीने निरोप दिला. पण नवा एबी फॉर्म आला तेव्हा त्यावर डॉ सुधीर तांबे यांचे नाव होते आणि दुसऱ्या पर्यायावर नील असे लिहिले होते. याचाच अर्थ या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही, हे क्लिअर होते. आता आपण आमदार झालो असलो तरी कुठल्याही पक्षात जाणार नसून अपक्ष म्हणूनच मतदारांचे प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी असे सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण

Last Updated : Feb 4, 2023, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.