ETV Bharat / state

नाशिक: पालिका रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

नाशकातील सातपूर कॉलनीत असलेल्या महापालिका रुग्णालयात मंगळवारी (दि. 12मे) हा दिन साजरा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

nashik
पालिका रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा
author img

By

Published : May 13, 2020, 1:27 PM IST

Updated : May 13, 2020, 2:17 PM IST

नाशिक- सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर निःस्वार्थपणे उपचार करणाऱ्या परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंती निमित्ताने 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. सालाबाद प्रमाणे सातपूर कॉलनीत असलेल्या महापालिका रुग्णालयात मंगळवारी (दि. 12मे) हा दिन साजरा करण्यात आला.

पालिका रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने फ्लोरेन्स नाइटिंगेल प्रेरित झाल्या होत्या. म्हणूनच त्यांनी क्रिमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर निःस्वार्थ भावनेने उपचार केली. जगासमोर एक वेगळा आदर्श मांडला. एवढेच नाही तर ते रात्रीच्यावेळी कोणी जखमी आहे का हे पाहण्यासाठी कंदील घेऊन त्या फिरत आणी कोणी जखमी आढळला की लागेच उपचार करत म्हणून रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली.

त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ 12 मे म्हणजेच त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये 'जागतिक परिचर्यादिन' मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावर्षी जगावर कोरोनांने घातलेले थैमान पाहता सातपूर कॉलनी परिसरात असलेल्या महापालिका रुग्णालयात साधेपणाने परिचारिका दिन साजरा करण्यात आला. रुग्णालयाच्या अधिसेविका रोहिणी पंडित जोशी यांनी परिचारिका दिन साजरा करण्याचे कारण काय हे सांगितले.

सातपूर महापालिका रुग्णालयात सोशल डिस्टन्सजिंगचे पालन करत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला न घाबरता ज्या परिचारिका दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - कोरोना रुग्णांची सेवा करून घरी परतलेल्या परिचारिकेवर रहिवाशांनी केली पुष्पवृष्टी

Last Updated : May 13, 2020, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.