ETV Bharat / state

नाशिकमध्ये शिवसेनेचा शो 'फ्लॉप'; भाजपचे सतीश कुलकर्णींची महापौर - सतीश कुलकर्णी यांची नाशिक महापालिकेत बिनविरोधी निवड

सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक परत आले. त्यामुळे नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महापौर आमचाच होईल म्हणणाऱ्या शिवसेनेचा शो 'फ्लॉप' ठरला आहे.

सतीश कुलकर्णींची महापौरपदी निवड
author img

By

Published : Nov 22, 2019, 12:29 PM IST

Updated : Nov 22, 2019, 12:44 PM IST

नाशिक - महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज निवडणूक झाली. महापालिकेत सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान होते. त्यासाठी गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सतीश कुलकर्णींची महापौरपदी निवड

महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 61 संख्याबळ आवश्यक होते. महापौर पदासाठी भाजपकडून सतीश कुलकर्णी उमेदवार होते. तर भिकुबाई बागूल उपमहापौर पदाच्या उमेदवार होत्या.

भाजपचे फुटीर 12 नगरसेवक भाजपच्या तंबूत परत

सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक परत आले. त्यामुळे नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महापौर आमचाच होईल म्हणणाऱ्या शिवसेनेचा 'शो फ्लॉप' ठरला आहे.

शिवसेनेने गळाला लावलेला भाजपचा नाराज गट ऐनवेळी भाजपच्याच गटात सामील झाला. सेनेच्या चारही इच्छुकांसह काँग्रेसनेही माघार घेतल्याने भाजपचे कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मनसेच्या 5 नगरसेवकांची वेळेवर भाजपला मदत केली आहे.

Intro:Body:

[11/22, 10:37 AM] Kapil Bhaskar: नाशिक न्यूज फ्लॅश...

- नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी थोड्याच वेळात निवडणूक

- महापालिकेत सत्ता टिकवण्याचं भाजपसमोर आव्हान, गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला

- काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपच्या काही नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिकेवर भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

- महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 61 संख्याबळ आवश्यक

- भाजपकडे सध्या 65 नगरसेवक असले तरी 10 ते 11 नगरसेवक फुटण्याची शक्यता असल्यानं भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जोरदार घोडेबाजार

- पाठिंब्याबाबत मनसे नगरसेवकांसोबत भाजप नेत्यांची बोलणी

- काँग्रेस नगरसेवकांनाही भाजपकडून ऑफर

- शिवसेनेकडूनही महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न

- महापौर पदासाठी भाजपकडून सतीश कुलकर्णी उमेदवार, तर भिकुबाई बागुल उपमहापौर पदाच्या उमेदवार

- शिवसेनेकडून महापौरपदासाठी अजय बोरस्ते उमेदवार, उपमहापौर पदासाठी भाजपचे फुटलेले नगरसेवक कमलेश  बोडके यांचं नाव

[11/22, 10:48 AM] Kapil Bhaskar: ब्रेकिंग

महापौर निवडणूक ट्विस्ट

भाजपचे फुटीर 12 नगरसेवक भाजपच्या तंबूत परत

भाजपचा महापौर होणार

सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्याने फुटीर नगरसेवक  परतल्याचा फुटीर नगरसेवकांचा दावा

[11/22, 11:36 AM] Kapil Bhaskar: - *नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड*

- महापौर आमचाच होईल म्हणणाऱ्या शिवसेनेचा फ्लॉप शो

- शिवसेनेने गळाला लावलेला भाजपचा नाराज गट ऐनवेळी भाजपच्याच गटात

- सेनेच्या चारही इच्छुकांसह काँग्रेसनेही माघार घेतल्याने भाजपचे कुलकर्णी बिनविरोध

- मनसेच्या 5 नगरसेवकांची  वेळेवर भाजपला मदत

Conclusion:
Last Updated : Nov 22, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.