ETV Bharat / state

Sangli APMC Result : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सरशी, भाजपाचा उडाला धुव्वा... - शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली

राज्याभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत.यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीने भाजपाचा धुवा उडवत एक हाती सत्ता मिळवली आहे. तर इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सर्वपक्षीय आघाडीला धोबीपछाड देत आपले वर्चस्व कायम राखले आहे. तसेच विटा बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीला चितपट करत शिवसेना शिंदे गट, भाजप, काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली आहे.

Sangli Apmc Election Result
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत निकाल
author img

By

Published : Apr 29, 2023, 6:47 PM IST

Updated : Apr 29, 2023, 7:11 PM IST

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. यामध्ये शिराळा आणि पलूस या दोन बाजार समित्या बिनविरोध झाल्या आहेत.त्यामुळे पाच बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. यापैकी सांगली, इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातली सगळ्यात मोठी बाजार समिती समजली जाते. देशात देखील या बाजार पेठेचे मोठी ओळख आहे. सुमारे एक हजार कोटीहुन अधिक उलढाल असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जत, कवठेमहांकाळ, मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीसह विष्णुअण्णा फळ मार्केटचे कामकाज चालते.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप: सांगली बाजार समितीवर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नेहमीच प्रतिष्ठापनाला लागते, आतापर्यंत या बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात होत्या. यंदा या बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसने जयश्री पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. भाजपाचे कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देखील महाविकास आघाडी विरोधात शेतकरी परिवर्तन पॅनल मैदानात उतरवले होते.

17 उमेदवार विजयी झाले: गुरुवारी या बाजार समितीचा 18 जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. 24 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानामध्ये जवळपास 92 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळी मिरज येथे मतमोजणी पार पडली आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. तर व्यापारी-अडते गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या उमेदवारीला 1 जागी पण विजय मिळवता आला नाही. त्यामुळे भाजपाला या ठिकाणी आपले खाते देखील उघडता आले नाही.

जयंत पाटलांनी सत्ता कायम राखली: इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक देखील लक्षवेधी ठरली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गेली पंचवीस वर्षांपासून एक हाती सत्ता आहेत. यंदाच्या या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येत आघाडी करून निवडणूक लढवली होती. यामध्ये काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटना यांचा समावेश होता. 82 टक्के इतकी मतदानाची नोंद हे बाजार समितीसाठी झाली होती.आज पार पडलेल्या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 18 जागांपैकी तब्बल 17 जागांवर घवघवीत विजय मिळवत निर्विवाद सत्ता कायम राखली आहे. तर विरोधी सर्वपक्षीय आघाडीच्या पॅनलला हमाल तोलईदार गटातील एकच जागा जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयंत पाटलांनी आपली सत्ता पुन्हा एकदा कायम राखली आहे.

विटा कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व: विटा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी देखील अत्यंत अटीतटीची लढाई झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सत्ताधारी शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलमध्ये लढत झाली. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पॅनल उभा करण्यात आले होते. तर या विरोधात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अरुण लाड, विटयाचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेना शिंदें गट, भाजपा आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने बाजी मारली आहे. 18 पैकी 18 जागांवर मोठ्या मातांच्या फरकानी या ठिकाणी विजय मिळवला आहे. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला एक देखील जागा जिंकता आली नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राखले आहे.

हेही वाचा: APMC Results Live Update राष्ट्रवादीच्या हाती सर्वाधिक तर भाजपकडे २५ बाजार समित्या अमरावतीत राणांचा धुव्वा

बाजार समितीत निकालाविषयी माहिती देताना पृथ्वीराज पाटील

Last Updated : Apr 29, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.