ETV Bharat / state

नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार, मराठा समाजाची रणनीती ठरली! - मराठा आरक्षणाला स्थगिती बातम्या

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजात नाराजी आहे. याविषयी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सरकारला तीन दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, शासनाकडून कोणती भूमिका स्पष्ट न केल्याने रविवारी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक
सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक
author img

By

Published : Sep 13, 2020, 4:51 PM IST

Updated : Sep 13, 2020, 7:06 PM IST

नाशिक - मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने आक्रमक झालेल्या मराठा बांधवानी आपली पुढची रणनीती ठरवण्यासाठी रविवारी सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे भाषण करत असताना बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव नाराज झाले असून त्यांनी आता आक्रमक पावित्रा घेतला आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चा बैठक

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सरकारला तीन दिवसांचा 'अल्टिमेटम' दिला होता. या तीन दिवसात शासनाने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने रविवारी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात जिल्हाभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मराठा बांधवांनी सहभाग घेतला. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. त्यात मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जो आमदार, खासदार शासनाला अथवा आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना खुले पत्र देणार नाही, त्यांच्याविरोधात गमिनी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा सूचनावजा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करत असताना त्यांच्या भाषणाला एका गटाने विरोध केला. फरांदे भाषणाला उभ्या राहताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यामुळे बैठकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा - मुंबई, महाराष्ट्रासाठी 'ठाकरे' ब्रॅण्ड टिकला पाहिजे; शिवसेनेची मनसेला साद

दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात सारथी शिक्षण संस्था सुरू करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 500 कोटींचा निधी द्यावा, मराठा वसतिगृहाचा प्रश्न तातडीने मिटवावा, आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आर्थिक साहाय्य आणि सरकारी नोकरी देण्यात यावी, चालू शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द न करता त्यांची पन्नास टक्के फी शासनाने भरावी, ज्या मराठा विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी लागली आहे. त्यांना विशेष नियुक्ती देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. दरम्यान, आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लवकरच निवेदन दिले जाणार असून त्यांनी शासन किंवा आपल्या पक्षातील वरिष्ठांकडे खुले पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'मराठा क्रांती'ची ठिणगी पडली..! सोलापुरात सरकार विरोधात तिरडी आंदोलन

Last Updated : Sep 13, 2020, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.