ETV Bharat / state

नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला - Attack on doctor news

लोखंडे मळा येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये डॉक्टरांसह दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

हॉस्पिटलवर हल्ला
हॉस्पिटलवर हल्ला
author img

By

Published : Apr 6, 2021, 5:05 PM IST

नाशिक - लोखंडे मळा येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये डॉक्टरांसह दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला
नाशिकरोड येथील रेडियंट प्लस हॉस्पिटल येथे केशराबाई सांबरे(वय 67) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही तासात वृद्धेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दहा ते पंधरा नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून डॉ. धनंजय शंकपाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने हातातील लोखंडी रॉडने हॉस्पिटलच्या मेडिकलची काच फोडली. यावेळी मेडिकलमध्ये काम करणारे हर्ष शेवानी यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांना नऊ टाके पडले. त्यानंतर संशयित नातेवाईकांनी शिवीगाळ व दमदाटी केली.या प्रकरणी उपनगर पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 143,144,145,323,504,506 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती, वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी नुकसान प्रतिबंधक कायदा कलम चार तसेच साथीरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 269,270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.