नाशिक - पिझ्झा, लॅपटॉप, डोसा, वडापाव, टेनिस सारख्या तुम्ही राख्या बघितल्यात का? नाशिकमध्ये राख्यांचा नवीन ट्रेंड दिसत आहे.
नाशिकच्या सोशल मीडियावर सध्या मैथिली कुलकर्णी हिने बनवल्या टेनिस, फुटबॉल, कॅमेरा, पिझ्झा, लॅपटॉप, डोसा, वडापाव राख्यांची चांगली चर्चा रंगली आहे.
बहिणींची भावाला साजेशी अशी राख्यांची मागणी
अनेक बहिणींचे भाऊ वेगवेगळे व्यवस्याय करतात. काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. मात्र, त्यांच्या बहिणीही आपला भाऊ जो व्यवसाय करतो, जेथे कामाला आहे. तेथील वस्तू, पदार्थांप्रमाणे राख्या मागत आहेत. त्यामुळे भावाला आवडेल आणि त्याच्या व्यवसायाला सूट होईल अशा प्रकारच्या राख्यांची ऑर्डर बहिणी मैथलीला देत आहेत. त्यानुसार, मैथिलीनेही राख्या बनवल्या आहेत.
राख्या बनवण्यासाठी मोलडेड क्लेचा वापर
राख्या बनवण्यासाठी मैथिलीने मोलडेड क्लेचा वापर केला आहे. या नवीन ट्रेंडच्या विविधरंगी आकर्षक राख्यांना मोठी मागणी आहे. आज (22 ऑगस्ट) रक्षाबंधन आहे.