नाशिक: राज्यातील सत्ताधारी पक्ष हा रोमच्या राजासारखा अय्याशी करण्यात गुंग असुन त्यांना जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. जनता मरते तर मरू द्या, अशी भुमिका राज्यातील सरकारची आहे. अशी सडकून टिका शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजु शेट्टी यांनी मनमाड येथे केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी विरोधात सरकार आहे. फक्त विरोधी पक्षच हा शेतकऱ्यांचा आहे असे सांगितले आहे.
शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकरी नेत्यांच्या अंत्यसंस्कारसाठी शेट्टी यांना जमल नव्हतं. त्यामुळे या शेतकरी नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी माजी खासदार राजु शेट्टी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकाराशी संवाद साधला असता, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. राज्यातील सरकारची थेट तुलना रोमच्या अय्याशी राजांसोबत केली आहे. सध्या सर्वचजण राजकीय रंगात रंगले आहेत. एकमेकांवर चिखलफेक करत आहेत खर, तर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे होती.
50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मात्र तेही ईडी इन्कम टॅक्सच्या भीतीने गांगरले आहेत. मात्र मला त्यात रस नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी मला तर मोकळं सोडा असेही माजी खासदार राजु शेट्टी म्हणाले आहेत. जनतेतल्या माणसांना निवडणुकींची भीती नसते. त्यामुळे मध्यवर्ती निवडणूका होऊ द्या, आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर जो सत्तेत असतो, तो शेतकरी विरोधी असतो. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई मागत होते. मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री असताना अवघ्या 13 हजार रुपयांची मदत केली असेही ते म्हणाले. 7 नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अफाट मोर्चा पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी साथ द्यावी. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना भर चौकात उघडा नागडा करून मारल्या शिवाय शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असेही माजी खासदार राजु शेट्टी यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत फालतू माणुस माजी खासदार राजू शेट्टी यांना पत्रकारांनी सदाभाऊ खोत यांच्याबद्दल प्रश्न विचारला. यावेळी हा विषय माझ्यासाठी केव्हाच संपला आहे. अशा फालतू माणसावर बोलण्यात मी वेळ घालवत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. आणि खोत यांच्याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला आहे.
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी साथ द्यावी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांची जवळपास 10 कोटींची फसवणूक झाली आहे. याबाबत मी मागेही आंदोलन केले होते. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी साथ द्यावी, फसवणूक करणाऱ्याना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही.