ETV Bharat / state

2008 च्या दंगली प्रकरणी इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता - 2008 riots case

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 ला मनसेने परप्रांतीयाविरोधातील आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी जवळच्या साईप्लाझा  हॉटेलवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

2008 च्या दंगली प्रकरणी ईगतपुरी न्यायालयाने केली राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
author img

By

Published : May 28, 2019, 11:07 PM IST

नाशिक - 2008 साली परप्रांतीया विरोधातील आंदोलनाच्या वेळेला इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये मनसैनिकांकडून दगडफेकीची घटना घडली होती. या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत इगतपुरीच्या न्यायालयात खटला सुरू होता. आजच्या सुनावणी दरम्यान इगतपुरी न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली.

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 ला मनसेने परप्रांतीयाविरोधातील आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी जवळच्या साईप्लाझा हॉटेलवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या नंतर हा खटला इगतपुरी न्यायालयात सुरू होता. अनेक वेळा कोर्टाने राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा राज ठाकरे कोर्टात आले नव्हते. अखेर न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात समन्स बजावल्याने राज ठाकरे 18 डिसेंबर 2018 ला इगतपुरी न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी कोर्टाने राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला होता. आजच्या सुनावणीत राज ठाकरे यांची इगतपुरी फौजदारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

2008 च्या दंगली प्रकरणी ईगतपुरी न्यायालयाने केली राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता.

2008 साली परप्रांतीय विरोधातील आंदोलनाच्या वेळेस इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये मनसैनिकांकडून दगडफेकीची घटना घडली होती, या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये मनसे राज मनसे अध्यक्ष यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला,ह्याबाबत इगतपुरी च्या न्यायालयात केस सुरू होती.आजच्या सूनवाई दरम्यान ईगतपुरी न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली आहे...

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 रोजी मनसेने परप्रांतीयां विरोधातील आंदोलन केलं होतं,मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी जवळील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केल्याची घटना घडली होती,या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता..ह्या नंतर ही केस   इगतपुरी न्यायालयात सुरू होती..अनेक वेळा कोर्टाने राज ठाकरे ह्यांना हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा राज ठाकरे कोर्टात आले नव्हते..अखेर न्यायालयाने राज ठाकरे ह्याच्या विरोधात समन्स बजावल्याने राज ठाकरे हे 18 डिसेंबर 2018 रोजी इगतपुरी च्या न्यायालयात हजर झाले होते..त्यावेळी कोर्टाने राज ठाकरे ह्यांना जामीन मंजूर केला होता.आजच्या सुनावाईत राज ठाकरे यांची इगतपुरी फौजदारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे..
 
टीप बातमीला राज ठाकरे ह्यांचा फोटो वापरणे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.