नाशिक - शहरातील बापू पुलाजवळील अवैध हुक्का पार्लरवर गुरुवारी मध्यरात्री मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकला. हा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी अवैध मद्यसाठा आणि देशी-विदेशी प्रकारचा हुक्का हस्तगत करण्यात आला.
हेही वाचा - ओबीसींची जातनिहाय जणगणना अशक्य, केंद्राने फेटाळला राज्याचा प्रस्ताव
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बापू पुलाजवळ छुप्या पद्धतीने अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होता. या आधारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.