नाशिक - भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे नेते पळवले. आणि त्यांना आमीश दाखवून मंत्री केले आहे. घटनेनुसार, राधाकृष्ण विखे-पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे शंभर टक्के मंत्री होऊ शकत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि कॉंगेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. हा भ्रष्टाचार आहे. याबद्दल आमच्या पक्षातील नेत्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आणि उद्या त्यावर सुनावणी होणार आहे.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 साली संसदेत त्यांनी केलेल्या घटनादुरुस्ती केली होती. त्यानुसार राधाकृष्ण विखे-पाटील आणि जयदत्त क्षीरसागर हे मंत्री होऊ शकत नाही. या दोघांनाही त्वरित मंत्रिमंडळातून काढून टाकावे. मुख्यमंत्र्यांनी हा मंत्रिपदाचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यावेळी यांनी केला.
आगामी विधानसभेबाबत बोलताना ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी बरोबर आमची चर्चा सुरू आहे. विधानसभेत आमची आघाडी होईल. मतदान ईव्हीएम मशीनवर न होता बॅलेट पेपरवर व्हावे यासाठी सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. त्यानुसार निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे असे मतही, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले