ETV Bharat / state

महागाई विरोधात अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ निषेध आंदोलन

डावी लोकशाही आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. पेट्रोल १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. राज्य व केंद्र सरकारमधील सत्ताधारी पेट्रोल व डिझेल वरील कर कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी खोटी आंदोलने करून दिशाभूल करीत आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Feb 9, 2021, 7:52 PM IST

नाशिक - पेट्रोल-डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. पेट्रोल १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. राज्य व केंद्र सरकारमधील सत्ताधारी पेट्रोल व डिझेल वरील कर कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी खोटी आंदोलने करून दिशाभूल करीत आहेत. ५० रूपये लिटर पेट्रोलवर केंद्र व राज्यसरकार सर्व कर लावून वसुली करीत आहे. याचा निषेध म्हणून डावी लोकशाही आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

नाशिक

भाजप पक्ष खोटी आंदोलने करतो - डी.एल.कराड

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाल्याने मंगळवारी डावी लोकशाही आघाडीच्या वतीने नाशिकच्या अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ निदर्शने करून वाढत्या महागाईचा निषेध केला. केंद्र शासनाने निवडणुकांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता केंद्रामध्ये सत्तेत असताना देखील भाजपच्या वतीने खोटी आंदोलन करून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आला.

नवीन वीज बिल कायदा आला तर जनतेला आणखी अडचणी

केंद्र सरकार नवीन वीज बिल कायदा आणून गरीब, शेतकरी, घरगुती वीज वापर करणाऱ्या १०० युनिटपर्यंतची सवलत रद्द करण्याची तरतुदी करून सर्वसामान्य जनतेला आणखी अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. या आंदोलनाला डावी लोकशाही आघाडीचे डॉक्टर डी. एल कराड, राजू देसले, गणेश उनवणे, मनीष बस्ते, तानाजी जायभावे, महादेव खोडे, शशी उनवणे, सिताराम ठोंबरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.