ETV Bharat / state

पंतप्रधान मोदी घेणार काळारामाचं दर्शन, गोदा आरतीही करणार; आयुष्मान हेल्थ कार्डचंही करणार वितरण - सत्याग्रह

PM Modi Visit Kalaram Mandir : राष्ट्रीय युवा संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (12 जानेवारी) नाशिकमध्ये रोड शो करणार आहेत. मोदी काळारामाचं दर्शन घेतील, तसंच दक्षिण गंगा अशी ख्याती असलेल्या गोदावरीची महाआरतीही करतील. त्यानंतर राष्ट्रीय युवा संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

prime minister narendra modi will visit kalaram mandir on 12th january know history about kalaram mandir
पंतप्रधान मोदी गोदा आरतीसह करणार काळारामाचं दर्शन; आयुष्मान हेल्थ कार्डचंही करणार वितरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 1:07 PM IST

नाशिक PM Modi Visit Kalaram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त 12 जानेवारीला नाशिकमध्ये येत आहेत. दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदींचं नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगरमधील निलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरनं येतील. हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा रोड शो असेल. संभाजीनगर नाका येथून ते जुन्या आडगाव नाका पंचवटी मालेगाव स्टॅंड मार्गे रामकुंड येथे जातील. तेथे गोदावरी मातेची महाआरती करून ते श्री काळाराम मंदिरात जाऊन रामरक्षा पठण करतील. मोदींच्या काळाराम मंदिर दर्शनावेळी सुरक्षेसाठी काही काळ भाविकांना परिसरात येण्यास मज्जाव असेल. त्यानंतर तपोवन येथील सभास्थळी पंतप्रधान राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करतील.

आयुष्मान हेल्थ कार्डचं करणार वितरण : देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्तानं आयुष्यमान हेल्थ कार्डचा नवा पॅटर्न संपूर्ण देशभरात पोचणार आहे. त्याची सुरुवात पंचवटीतील श्री काळाराम मंदिर पासून होणार असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. मंदिर परिसरात त्यासाठी कक्ष उभारण्यात येत असून येणाऱ्या प्रत्येक भाविकांची माहिती घेऊन मंदिरात जाताना त्यांची नोंदणी आणि दर्शन झाल्यानंतर बाहेर पडेपर्यंत भाविकांच्या मोबाईलमध्ये आयुष्मान हेल्थ कार्ड जनरेट होईल असा विश्वास थेटे यांनी व्यक्त केला.

श्री काळाराम मंदिराप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील आयुष्मान हेल्थ कार्ड वितरण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. - ओमप्रकाश शेटे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष

मोदींनी काळाराम मंदिरच का निवडले : नाशिकचे श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्ती या मंदिरात विराजमान आहे. या काळाराम मंदिरात देशभरातून पर्यटक दर्शनासाठी येत असतात. तसंच दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. म्हणूनही या मंदिराचे अनेक ऐतिहासिक पैलू असल्यानं पंतप्रधान मोदींनी या मंदिराची दर्शनासाठी निवड केल्याचं म्हंटलं जातंय.

पेशवेकालीन मंदिर : श्री काळाराम मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम हे सव्वादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा दिली होती. याच काळात ओढेकर यांना ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचं बोललं जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होतं. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळाल्या होत्या. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत, असंही बोललं जातं. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचे परीक्षण केले गेले. तेच दगड वापरण्यात आले. 1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झालं. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रुपये इतका खर्च आला होता.

काळाराम मंदिर प्रवेशासाठी आंबेडकरांनी केला होता सत्याग्रह : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचं मान्य केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारलं होतं. हा सत्याग्रह 5 वर्षे 11 महिने आणि 5 दिवस सुरू होता. अखेर मानवी हक्क मिळवण्यासाठी अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 रोजी स्वाभिमानाने श्री काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला.

आम्हीही सजीव माणसे आहोत : आम्हाला काळाराम मंदिरात प्रवेश करून रामभक्त बनायचे नाही. तर, या भारत देशात असणाऱ्या दगडाच्या देवाला आणि जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की आम्हीही सजीव आहोत. जो धर्म आम्हाला स्वीकारत नाही त्या ठिकाणी लाचार होऊन काय उपयोग? असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहानंतर म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. अयोध्येत न जाता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात करणार महाआरती, 'हे' सांगितलं कारण
  2. उद्धव ठाकरे हे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत 'हे ही नसे थोडके'; काळाराम मंदिरावरून फडणवीस यांचा टोला
  3. Ram Janmotsav At Nashik: ढोल ताशांच्या गजरात, 'जय श्री रामा'च्या जय घोषाने दुमदुमला काळाराम मंदिर परिसर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.