नाशिक - राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यासह भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते. दरम्यान, नाशिकच्या बाजारांमध्ये सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आता भाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. परिणामी ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित नफा होत नसल्यानं शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे.
कधी गारपीट, कधी अवकाळी तर कधी ओला दुष्काळ यामुळे कायमच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला यंदा पावसाळा लांबल्यामुळे फटका बसला आहे. दीड-दोन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा आणि भाजीपाल्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामन्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमोडले होते. दरम्यान, बाजारात आता भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. दरामधील ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी असली तरी, शेतकऱ्यांना मात्र उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या आठवड्यातील भाजीपाल्याचे दर (प्रति किलो) आजचे दर (प्रति किलो)
भाज्या आजचे दर गेल्या आठवड्यातील दर
टमाटा.. 10 रु किलो 40 किलो
भेंडी 40 रु किलो 60 किलो
कोबी 15 रु गडी 20 रु नग
बटाटे 20 रु किलो 20 रु किलो
मेथी 15 रु जुडी 30 रु जुडी
कोथिंबीर 30 रु जुडी 70 रु जुडी
वांगे 40 रु किलो 80 रु किलो
दोडके 30 रु किलो 60 रु जुडी
गिलके। 20 रू किलो 60 रू किलो...
गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे दर वाढले होते म्हणून भाजीपाला घेणे परवडत नव्हता आता हे दर कमी झाल्याने आम्ही भाजीपाला खरेदी करत आहोत.
एकीकडे यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरलं तर दुसरीकडे ग्राहकांसाठी देखिल त्यांच्या खिशाला चाट लावणारं ठरलं..यंदाच्या वर्षभरात भाज्यांची आवक कमी झाल्यानं दर तर वाढले मात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. आता आवक वाढल्याने ग्राहकांना जरी थोडा दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांचा मात्र झालेला खर्च देखिल निघत नसल्यानं त्यांची चिंता वाढली आहे. पुढच्या काही दिवसात तरी परिस्थिती सुधारेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे.