नाशिक - येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीत एका गरोदर महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. ही महिला पाच ते सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीत पल्लवी प्रमोद गायकवाड (रा. एमपीए कर्मचारी वसाहत) या 30 वर्षीय महिलेने रविवारी दुपारी 3 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ती एमपीए मध्ये राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची नातेवाईक होती असल्याचं समजतंय. याबाबत जितेंद्र गोपीनाथ दिवे या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली असून यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, मयत महिलेने घरी कुणीही नसताना घराच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली. दरम्यान, ही महिला पाच ते सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करत आहेत.
नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण अकादमीत गर्भवतीची आत्महत्या
पोलीस प्रशिक्षण अकादमीत गर्भवतीच्या आत्महत्येच्या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याविषयी पोलिस अधिक तपास करीत आहेत.