ETV Bharat / state

दिंडोरीत अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका; शेतकरी चिंतेत - दिंडोरीत अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका

करोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतक-यांना भांडवल देखील तयार करता आलेली नाही. त्यामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात द्राक्षे फेकून द्यावी लागली होती.

दिंडोरीत अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका; शेतकरी चिंतेत

author img

By

Published : Jan 9, 2021, 10:43 AM IST

दिंडोरी ( नाशिक ) -तालुक्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावासाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. या भागात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्यामुळे द्राक्ष बागांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.

अवकाळी पाऊस द्राक्ष उत्पादकांसाठी डोकेदुखी

दिंडोरी तालुक्यात लवकर छाटणी करण्यात आलेली द्राक्षे विकण्यासाठी पूर्ण तयार आहेत. मात्र, सतत पडणा-या रिमझिम पाऊसामुळे या छाटणी करण्यात आलेल्या द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकण्यात आले आहे. आशा घडांमध्ये पाणी गेल्यास द्राक्षांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्यास द्राक्ष मण्यावर काळे डाग पडतात त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसाठी हा अवकाळी पाऊस डोकेदुखी ठरत आहे.

करोनामुळे मागील हंगामात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान

करोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतक-यांना भांडवल देखील तयार करता आलेली नाही. त्यामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात द्राक्षे फेकून द्यावी लागली होती. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादन धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता अवकाळी पावसाचे द्राक्ष उत्पाकांसमोर मोठे आव्हान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.