नाशिक - चक्रीवादळाचा मनमाड नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. अचानकपणे आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. केळीच्या बागा, कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला ( rains damage banana orchards in nangaon nashik ) आहे.
या नुकसानग्रस्त भागांची तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिल आहे. पंचनामा करुन त्वरित शासनाला अहवाल पाठवण्यात येईल, असं मोरे यांनी सांगितलं आहे.
बुधवारी मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या वादळी पावसाने कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेकडो टन कांदा खराब झाला आहे. यासह बोराळे अमोदे येथील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - Solapur : धक्कादायक, धावत्या एसटी बसमध्ये प्रवाशाने केलं विष प्राशन