येवला (नाशिक- केंद्र सरकार हे गरज नसताना परदेशातून अनावश्यक डाळी आयात करत असल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात येवल्यात गुरूवारी प्रहारच्या वतीने टाळ्या व थाळ्या वाजवून निषेध करण्यात आला.
डाळी आयात केल्याने केंद्र सरकारच्या निर्णयाविरोध -
मागील आठवड्यात केंद्र सरकारने तूर डाळी सह इतर डाळी परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय केंद्र सरकारचा नेहमी प्रमाणेच शेतकऱ्यांना मारक ठरणारा आहे. असा आरोप प्रहारच्या वतीने करण्यात आला. वास्तविक देशात पंचेचाळीस लाख टन डाळीचे उत्पादन असून देशाची गरज बेचाळीस ते त्रेचाळीस लाख टन आहे. मग जर देशाअंतर्गत उत्पादन गरजेपेक्षा जास्त असूनही केंद्र सरकार सुमारे सात लाख टन डाळी परदेशातुन नेमकं कुणाच्या फायद्या करता आयात आहे असा सवाल प्रहारने उपस्थित केला आहे.. याचा निषेध करण्यासाठी येवल्यातील प्रहार संघटनेने प्रत्येक गावात कोरोनाचे सर्व नियम पाळत टाळ्या व थाळ्या वाजवत निषेध आंदोलन केले.