ETV Bharat / state

कऱ्हा, केळी विकण्यास परवानगी द्या, कुंभार व्यवसायिकांची मागणी - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज

अक्षय्य तृतीयेसाठी आवश्यक असणारे कऱ्हा, केळी बनवणाऱ्या कुंभारांना सलग दुसऱ्या वर्षी देखील कोरोनामुळे फटका बसला आहे. तयार केलेले कऱ्हा, केळी विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कुंभार व्यवसायिकांनी केली आहे.

लॉकडाऊनचा कुंभार व्यवसायिकांना फटका
लॉकडाऊनचा कुंभार व्यवसायिकांना फटका
author img

By

Published : May 11, 2021, 7:27 PM IST

येवला - अक्षय्य तृतीयेसाठी आवश्यक असणारे कऱ्हा, केळी बनवणाऱ्या कुंभारांना सलग दुसऱ्या वर्षी देखील कोरोनामुळे फटका बसला आहे. तयार केलेले कऱ्हा, केळी विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कुंभार व्यवसायिकांनी केली आहे.

अक्षय्य तृतीया करता कऱ्हा, केळी तयार करणाऱ्या येवल्यातील कुंभारांना कोरोनाचा फटका बसला असून, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट या सणावर आहे. अक्षय्य तृतीयाला मातीपासून तयार केलेल्या कऱ्हा, केळीला विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे सर्व बाजरपेठ बंद असल्याने तयार केलेल्या कऱ्हा, केळी कशा विकणार असा प्रश्न कुंभार व्यवसायिकांना पडला आहे. प्रशासनाने आम्हाला कऱ्हा, केळी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुंभार व्यवसायिकांनी केली आहे.

लॉकडाऊनचा कुंभार व्यवसायिकांना फटका

कऱ्हा, केळी तयार करण्याचे प्रमाण घटले

साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणून अक्षय्य तृतीया हा सण ओळखला जातो. मात्र सलग दुसऱ्याही वर्षी कोरोनाचा फटका या सणाला बसला असून, अक्षय्य तृतीयेसाठी लागणाऱ्या कऱ्हा, केळी बनवणाऱ्या कुंभार समाजाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षापासून सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे यावर्षी कऱ्हा, केळीच्या उत्पादनात घट झाली आहे.

हेही वाचा - 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्याचा विचार- राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.