लासलगाव ( नाशिक ) - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये डाळिंब तसेच मोसंबी लिलावास शुभारंभ झाला. डाळिंबाला जास्तीत जास्त प्रति कॅरेट 4200 रुपये तर 1700 रुपये सरासरी भाव मिळाला असून मोसंबीला 1100 रुपये प्रति कॅरेट सरासरी भाव मिळाला आहे.
डाळिंब लिलाव सुरुवात - निफाड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब तसेच मोसंबी लिलावा शुभारंभ झाला. जवळपास 500 कॅरेटची आवक झाली असून डाळिंबाला जास्तीत जास्त प्रति कॅरेट 4200 रुपये तर 1700 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला आहे. मोसंबीला 1100 रुपये प्रति कॅरेट सरासरी बाजार भाव मिळाला आहे. परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा ,देवळा ,कळवण, सिन्नर ,कोपरगाव, राहुरी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गेल्या आठ वर्षापासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाचा लिलाव होत असून मागील वर्षी डाळिंबात बाजार समितीची तीन कोटीची उलाढाल झाली आहे. शेतकऱ्यांनी योग्य प्रतवारी करून कॅरेटमध्ये डाळिंब आणल्यास त्यांना चांगला बाजार भाव मिळेल. त्यामुळे योग्य प्रतवारी करून डाळिंब घेऊन येण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.