ETV Bharat / state

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत; युतीसह आघाडीला मतविभाजनाची धास्ती - समीर भुजबळ

नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होत असल्याचे दिसत आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेद्वारांमुळे मतविभाजनाचा फटका बसणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत
author img

By

Published : Apr 27, 2019, 7:02 PM IST

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार होत असल्याचे दिसत आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेद्वारांमुळे मतविभाजनाचा फटका बसणार आहे. याचीच धास्ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी घेतली आहे.

भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे पाठबळ असलेल्या कोकाटेंच्या उमेदवारीमुळे सेनेचे उमेदवार गोडसेंच्या मतावर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळांना त्यांच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत

प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार असले तरी खरी लढत महायुती आणि महाआघाडीमध्ये होणार हे स्पष्ट झाले आहे. कारण अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे ह्यांनी बोलण्यातून कितीही गाजावाजा केला तरी त्यांची झेप सिन्नर तालुक्यापर्यंत मर्यादित असल्याचे जाणवू लागले आहे. मराठा क्रांती मोर्चात त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना थोड्याफार स्वरूपात मतदान पडेल. यामुळे कोकाटे महायुतीच्या मतांना खिंडार पाडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना २ समाजाच्या मतदानावर उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ आघाडीचे अस्तित्व दाखवण्यासाठी कोणीतरी उमेदवार हवा आहे, म्हणून पवन पवार यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडली आहे. शिवाय त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांना सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे. ते जर ही मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले, तर त्याचा फटका भुजबळांना बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळांनी मॅनेजमेंटचा वापर करत सुरवातीपासून शांतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी मंत्री छगन भुजबळांचा पाठिंबा आणि खासदारकीच्या काळात केलेल्या कामाच्या बळावर समीर भुजबळ पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वपक्षाबरोबरच मित्रपक्षांना बरोबर घेत त्यांनी प्रचार यंत्रणा कौशल्याने राबवली आहे. त्यांना चिंता आहे ती फक्त वंचित बहुजन आघाडीची.

मोदी आणि शहा राजकारणात नको, म्हणून भाजप आणि शिवसेनेला मतदान करू नका, असे मनसेने जनतेला सांगितले आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे मनसेचा मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळाल्याचे चित्र आहे.

Intro:नाशिकच्या लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत,वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवरांच्या मतांचे विभाजन होण्याची महायुती,महाआघाडीला धास्ती...

Body:नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ ह्यांनी मतांचे विभाजन होईल ह्या मुळे धास्ती घेतली आहे,भाजप मधून बाहेर पडून माजी आमदार माणिकराव कोकाटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे,भाजप मधून बाहेर पडलेले आणि मराठा समाज पाठबळ असलेल्या कोकाटे ह्यांच्या उमेदवारी मुळे सेनेचे उमेदवार गोडसे ह्यांच्या मतावर परिणाम होऊ शकतो..दुसरी कडे वंचित बहुजन आघाडी कडून माजी नगरसेवक पवन पवार यांच्या उमेदवारी मुळे
राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ ह्यांना मतांचे विभाजन होईल अशी धास्ती आहे...

काल परवा पर्यँत निवडणूक आहे असं वाटतं नव्हतं मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्यात सर्वच पक्षातील दिगग्ज नेत्यांच्या सभा मुळे निवडणूकीचे वातावरण तापले आहे...नाशिक लोकसभा मतदारसंघात पायलीचे पंधरा उमेदवार असले तरी खरी लढत महायुती आणि महाआघाडी मध्ये होणार हे स्पष्ट झालं आहे...कारण अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे ह्यांनी बोलण्यातून कितीही गाजा वाजा केला तरी त्यांची झेप सिन्नर तालुक्यापूर्ती मर्यादित असल्याचे जाणवू लागले आहे..नाही म्हणायला मराठा क्रांती मोर्चात त्यांच्या सहभाग होता,त्याची काही पुण्याई मतांच्या स्वरूपात पदरात पडली तर पडेल,मात्र ह्यातून कोकाटे हे महायुतीच्या मतांना खिंडार पाडणार हे स्पष्ट झालं आहे..

दुसरे आहे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार,दोन समाजाच्या आघाडीवर वंचित आघाडीने उमेदवार उभा केलाय,हे प्रारंभीचं स्पष्ट झालं आहे,केवळ आघाडीचे अस्तित्व दाखवण्यासाठी कोणीतरी उमेदवार हवा आहे म्हणून पवन पवार यांच्या गळ्यात उमेदवारी माळ पडली आहे .पण प्रभागा पूर्ती प्रतिमा असल्यानं,तसंच एकगठ्ठा मतांच्या बेगमीवरच पवारांचं निवडणुकीतलं अस्तिवत राहील .या शिवाय कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मातांना पवन पवार ह्यांनी सुरुंग लावला असून ही मतं ते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झालेत, तर त्याचा फटका भुजबळांनां बसेल हे नक्की..

दुसरीकडे महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ ह्यांनी मॅनेजमेंट चा वापर करीत ,सुरवाती पासून शांत पणे प्रचाराला सुरवात केली आहे,माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंबा,खासदारकीच्या काळात केलेल्या या बळावर समीर भुजबळ पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे...स्वपक्षा बरोबरच मित्र पक्षानं बरोबर घेत प्रचार यंत्रणा कौशल्याने रावबावली,फक्त त्यांना चिंता आहे ती वंचित आघाडीची..
तरी महाआघाडीची खरी मदार आहे ती मनसेवर,मोदी आणि शहा राजकारणात नको म्हणून तुम्ही भाजप आणि शिवसेनेला मतदान करू नका असं त्यांनी म्हटलं आहे,ही बाब राष्ट्रवादी कॉग्रेस च्या पथ्यावर पडली आहे,बरचसा मनसेचा मतदार हा राष्ट्रवादी कॉग्रेस कडे वळल्याचे चित्र आहे..

राहता राहिलं ते महायुतीचे हेमंत गोडसे यांचं,पक्ष अंतर्गत विरोधानंतर ही गोडसेनां सर्वांनी सोबत घेत प्रचार यंत्रणा राबवली, मतदारसंघात 4 आमदार युतीचे असल्यानं ही गोडसेंच्या दृष्टीने जमेची बाजू आहे,
प्रत्येक आमदाराला विधानसभेची काळजी असल्याने जो तो आपल्या मतदारसंघात खिंड लढवणार हे गोडसेंच्या पथ्यावर पडणारी बाब,
भाजनंही नाशिकची जागा प्रतिष्ठेची केली आहे,असं आज पर्यंतचं
चित्र आहे,महायुती असली तरी त्यापैकी एक असलेला आरपीआय हा मित्रपक्ष मात्र गोडसेंच्या प्रचारा पासून अलिप्त राहिला आहे,गोडसेंच्या वाटेत अडसर ठरतील ते फक्त अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे .
कोकाटेनां जी मतं मिळतील ती कशी भरून काढायची ही समस्या गोडसेना सतावतेय हे नक्की..
दोन दिवसांवर मतदानाची घटिका समीप आली असून केवळ मतदान पुरतेच गृहीत असलेला मतदार राजा काय करामत करतोय,हे पाहणे उत्सुकत्याचं ठरणार आहे,
तर्कवितर्क अंधश्रद्धेचा भाग असला तरी नाशिककर भाकरी फिरवणार की इतिहास घडवणार हे 29 मे ला ठरणार आहे..

काल पर्यँत निवडणुका आहे असं वाटतं नव्हतं,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.