नाशिक - पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील ८०० पेक्षा अधिक पोलिस अधिकाऱ्यांना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आहे. १ मे ला महाराष्ट्र दिनादिवशी या पोलिसांना पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
दरम्यान पोलिस महासंचालक पदक जाहीर झालेल्या विभागांमध्ये नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र पोलीस अकादमी अशा वेगवेगळ्या विभागातील जवळपास 50 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. यातील नंदू उगले यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळांमध्ये सहभागी झाल्याने पदक प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित सर्वांना गुणवत्तापूर्वक सेवा केल्याचा निकष ठेवण्यात आला आहे. १ मे ला होणाऱ्या सोहळ्यामध्ये ही पदक प्रदान करण्यात येतील.
पदक मिळालेले अधिकाऱ्यांमध्ये मधुकर सातपुते ( सहाय्यक समादेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी) राजेंद्र चौधरी (पोलीस उपनिरीक्षक नाशिक ग्रामीण) संतोष पाटील ( पोलीस उपनिरीक्षक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय) राजेंद्र चौधरी (पोलीस उपनिरीक्षक नाशिक ग्रामीण) यांचा समावेश आहे.
नाशिक शहर पोलिस दलातील एएसआय :-
राजू साळवे ,मनोहर वाघ ,शिवाजी भाऊसाहेब देशमुख,पोपट सोनू कारवार, रमेश तुकाराम देशमाने, संजय काशिनाथ सूर्यवंशी.
नाशिक शहर पोलिस दलातील कर्मचारी :-
नंदू रामभाऊ उगले ,चंद्रकांत त्र्यंबक सदावर्ते, दत्तात्रय पोपट माळदे, मधुकर नथू घुगे, माणिक तुकाराम गायकर, सोमनाथ सातपुते ,मनोज हरिभाऊ विसे, रविंद्र काशिनाथ बागुल, मोहन वामन कडवे, पोपट वामन माळोदे, संजय नारायण जाधव, गणेश मनाजी मेहबूब जैनद्दीन सय्यद, कैलास भिमाजी कुशारे, अनिल पांडुरंग दिघोळे, जितेंद्र दिलीप सिंग परदेशी, प्रफुल्ल सुरेश माळी, संजय त्र्यंबक सानप, प्रदीप चंद्रकांत म्हसदे. राज्यातील आठशेहून अधिक पोलिसांना पोलिस महासंचालक पद जाहीर करण्यात आले आहेत