ETV Bharat / state

मालेगावात अनधिकृतपणे चालणाऱ्या हाडाच्या कारखान्यांवर कारवाई - action

शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या आठवड्यात मोठी जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

पोलिसांचा अनधिकृत कारखान्यांवर छापा
author img

By

Published : Apr 1, 2019, 1:29 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हाडांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नाशिकचे अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने केली. रविवारी सायंकाळी या पथकाने परिसरातील चार ते पाच बेकायदेशीर कारखाने सीलबंद केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांचा अनधिकृत कारखान्यांवर छापा

शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या आठवड्यात मोठी जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रविवारी या पथकाने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हाडे व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे. विशेष पोलीस पथकाने या विषयी माहिती मिळाल्यावर रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेले हाड उकळण्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने ते नष्ट केले जाणार आहे.

गेल्या ५ दिवसापूर्वी रस्त्यावर म्हशीच्या सागाडे आढळून आले होते, तेव्हापासून अनधिकृत कारखाने चालत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. परंतु या संदर्भात महापालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने हाडाचे कारखाने चालवणाऱ्यांना कुठेतरी महापालिकेचे पाठबळ मिळते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकार्यक्षम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या अनधिकृत कारखान्यावर आजपर्यंत कुठलेही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहरातील पवार वाडी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर रीत्या सुरु असलेल्या हड्डी कारखान्यावर अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला रविवारी संध्याकाळी पथकाने या परिसरात असलेल्या चार ते पाच बेकायदेशीर कारखान्याला सील बंद करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Body:शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर मागच्याच आठवड्यात मोठी जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता रविवारी पथकाने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हड्डी व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे विशेष पोलीस पथकाने या विषयी माहिती मिळाल्यावर रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी असलेले हड्डी उकळण्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने ते नष्ट केले जाणार आहे

Conclusion:मागील पाच दिवसापूर्वी म्हशीच्या सागाड्यामुळे रस्त्यावर आढळून आले होते तेव्हापासून अनधिकृत कारखाने चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता परंतु या संदर्भात महापालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने हंडी कारखाने चालवणाऱ्याना कुठेतरी महापालिकेचे पाठबळ मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अकार्यक्षम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या अनधिकृत कारखान्यावर आजपर्यंत कुठलेही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.