ETV Bharat / state

शिवजयंती विशेष :  नाशकात गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीसह आकर्षण ठरतीय 'भवानी' तलवार - Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary

शिवजयंती निमित्ताने शहरातील सीबीएस परिसरात शिवाजी महाराजांचे गड किल्ले, शस्त्रास्त्रे यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शिवजयंती पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. साडेतेरा फूट लांब आणि १२३ किलो वजनाची तलवार या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.

शिवजयंतीनिमित्त गड-किल्ले, शस्त्रास्त्रांचे फोटो प्रदर्शन

author img

By

Published : Feb 17, 2020, 5:39 PM IST

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नाशिकच्या छत्रपती सेनेने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. साडेतेरा फूट लांब आणि १२३ किलो वजन असलेल्या स्वराजाच्या भवानी तलवारीची त्यांनी प्रतिकृती साकारली असून आज(सोमवार) सकाळी या तलवारीचा अनावरण सोहळा पार पडला. सीबीएस परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविद्यालयीन तरुणींच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अजय मिसर, सुरगाणा घराण्याच्या सोनाली राजे भोसले यांच्यासह बिटको शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त गड-किल्ले, शस्त्रास्त्रांचे फोटो प्रदर्शन

शिवजयंती निमित्ताने शहरातील सीबीएस परिसरात शिवाजी महाराजांचे गड किल्ले, शस्त्रास्त्रे यांच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शिवजयंती पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. साडेतेरा फूट लांब आणि १२३ किलो वजनाची तलवार या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. ही तलवार बनवण्यासाठी स्टील, लोखंड आणि पितळ या धातूंचा वापर करण्यात आला असून तिला बनवण्यासाठी २ महिने लागले आहेत. आजघडीला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना ही तलवार बघून त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे छत्रपती सेनेकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - चोंडी घाटजवळ किरकोळ वादातून वऱ्हाडाचा ट्रक अडवून मारहाण

राज्यात आणि देशात महिला अत्याचाराच्या घटना घडत आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करत असताना महिला अत्याचार आणि अन्याय होऊ नये यासाठी तलवार दिली होती. तशाच पद्धतीच्या तलवारीची प्रतिकृती तयार करून महिलांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस निर्माण झाले पाहिजे. महिला अत्याचाराच्या घटना कमी होण्यासाठी त्या सक्षम व्हाव्यात यासाठी ही तलवार तयार करण्यात आली आहे. साधारणपणे २० कारागिरांची मेहनत आणि २ महिन्यांचा कालावधी या तलवारीला तयार करण्यासाठी लागला आहे. ही तलवार स्टील, लोखंड, पितळ अशा धातूंचा वापर करुन तयार करण्यात आली आहे. त्याच्यावर खडे मोती असा साजही चढवण्यात आला असून सध्या ही तलवार प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हेही वाचा - नाशकात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.