नाशिक : पीएफआय संघटनेशी संबंध असलेल्या सदस्य मौलाना इरफान दौलत नदवीला मालेगाव येथून 13 तारखेला रात्री अटक (PFI member Maulana Nadvi arrested) करण्यात आली. आज एटीएस पथकाने मौलानाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी (14 days police custody to Maulana Nadvi) सुनावली आहे. Latest news from Nashik, Nashik Crime
कोण आहे मौलवी?
दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा एटीएस आणि एनआयए यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या अनेक हस्तकांना ताब्यात घेतले. याचवेळी महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे पीएफआयचे मोठे केंद्र असल्याचे छापेमारीमधून समोर आले आहे. याआधीही पीएफआयच्या काही सदस्यांना मालेगावातून अटक करण्यात आली होती. त्याचसोबत त्यांच्या कार्यालय तसेच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पुरावेही हस्तगत करण्यात आले होते. पुन्हा एकदा पीएफआयशी संबंध असलेल्या मौलवीला अटक केल्याने मालेगाव कनेक्शन समोर येत आहे.
मौलवी इरफानवर होती एटीएसची नजर- इमाम कौन्सिलचे अध्यक्ष असलेल्या मौलवी इरफान नदवी यांस मुंबई एटीएस कडून अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे. देशभरात झालेल्या छापेमारी आणि अटकसत्रानंतर स्थानिक पोलिसांनीही काही संशयितांना ताब्यात घेतले होते. अशातच मौलवी नदवी यालाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनंतर नदवी जामीनावर बाहेर होता. तेव्हापासूनच एटीएस आणि पोलिसांची त्याच्यावर बारीक नजर होती. दरम्यात, मागील काही दिवसात त्याच्या हालचाली संशयस्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहेत आरोप ?
मौलाना इरफान दौलत नदवी हे मालेगाव जामा मस्जिद मौलवी म्हणून कार्यरत आहे. 2019 पासून सक्रिय पीएफआयचा तो सदस्य आहे. आतापर्यंत पीएफआय 550 जणांशी फोनवर कम्युनिकेशन केले आहे. नुपूर शर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. नुपूर शर्माबाबत औरंगाबाद, बीड, जालना भागात आक्षेपार्ह मॅसेज पाठवले. इतर अटक केलेल्या सदस्यांसोबत अनेक वेळा संभाषण केले आहे. हे संभाषण कोर्टाला सादर करण्यात आले. व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून मुस्लिम समाजात असुरक्षित असल्याची भावना पसरवून सशस्त्र जातीय संघर्षाला खतपाणी घालणे, देशाबाहेर झालेल्या संशयास्पद फोन कॉल असे आरोप मौलवीवर ठेवण्यात आले आहेत.