नाशिक - आनंदवल्ली परिसर नवश्या गणपतीमुळे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आनंदीबाईची गढी प्रसिद्ध आहे. दरम्यान, येथील गढीच्या जागेत खोदकाम सुरु असताना एक भुयार आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात चर्चाना उधाण आले आहे. आनंदीबाई पेशवे यांच्या गढीच्या जागेत हा भुयारी मार्ग सापडल्याने या ऐतिहासिक ठेव्याच्या जतनाची जबाबदारी कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ऐतिहासिक भुयार सापडल्याने हा प्रकल्प येण्याची शक्यता -
आनंदवल्ली परिसरीसरातील हवेली नावाचा गृह प्रकल्पाच्या जागेत हे भुयार सापडलं आहे ही जागा आनंदी बाई पेशवे यांच्या गढीची आहे. मात्र, सध्या ही जागा शहरातील राजकीय क्षेत्रातील काही बड्या लोकांसह बांधकाम व्यवसायिकांच्या मालकीची आहे.यातिलच देवराम साठे नामक खाजगी विकासकाने या जागेवर हवेली नावाचा गृह प्रकल्प उभारणीस सुरवात केली आहे. मात्र या प्रकल्पाचा पाया खोदत असतांना या ठिकाणी ऐतिहासिक भुयार सापडल्याने हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
या ठिकाणी खोदकाम सुरू असताना सापडलेल्या या पेक्षवेकालीन भुयारात इतरही ३ ते ४ मार्ग असण्याचा अंदाज आहे. ज्या जागेवर गृहप्रकल्पा साठी खोदकाम केलं जातं आहे ही जागा सुरवाती पासून वादात असून ही गढी वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनात एका स्थानिकला आपला जीव देखील गमवावा लागल्याची पार्श्वभूमी आहे त्या मुळे आज पुन्हा या ठिकाणी भुयार सापडल्याने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नंतरच आपण हे काम सुरू केले -बांधकाम व्यवसायिक
गृहप्रकल्पाच्या ज्या ठिकाणी हे भुयार सापडले आहे आणि अध्यस्थितीत ही जागा ज्यांच्या मालिकीची असल्याचा दावा करणारे बांधकाम व्यवसायिक देवराम साठे यांनी देखील ही जागा आनंदी बाई यांच्या गढीचीच असल्याची कबुली दिली आहे. सापडलेले भुयार हे पेशव्यांच्या काळात शत्रूपासून लहान मुलांना वाचविण्यासाठी बनविण्यात आल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.साठे यांच्या आगोदर या जागेचे २ ते ३ मालक होऊन गेले असून त्यांनी ही जागा खाजगी मिळत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला. पुरातत्व विभागाचा ना हरकत दाखला घेऊनच आपण हे काम सुरू केल्याची माहिती बांधकाम व्यवसायिक देवराम साठे यांनी दिली आहे.
पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयात -
ज्या जागेत हे ऐतिहासिक भुयार सापडले आहे त्या आनंदी बाईंच्या गढीच्या जागेवर आजही नदीच्या आणि मंदिराच्या बाजूने दगडी पायऱ्या,दरवाजे,नदीच्या काठावर असनारे तट भुयारी मार्ग अशा जतन करण्यासारख्या ऐतिहासिक बाबी अस्तित्वात आहे. मात्र असा सगळा ऐतिहासिक ठेवा कायम असतांना ही जागा खाजगी विकासकांच्या ताब्यात कशी गेली असे प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले, गड किल्ल्यांवर एक भिंत बांधायला जो पुरातत्व विभाग शासनाच्याच विभागाला परवानगी देत नाही त्या पुरातत्व विभागाने या बांधकाम व्यवसायिकांला या जागेवर वारंवार इतक्या सगळ्या ऐतिहासिक पाऊलखुणा सापडत असताना ना हरकत दाखला कसा दिला, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. शिवाय अशा ऐतिहासिक बाबी सापडल्यानंतर तातडीने अशा जागांवरचे काम थांबवण्याचे आदेश देणार स्थानिक जिल्हाप्रशासन या प्रकरणाकडे का कानाडोळा करते आहे.
हेही वाचा - ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, परिवहनमंत्र्यांची माहिती