ETV Bharat / state

येवल्यात सीआरपीएफ' जवानांचे संचलन...पुष्पवृष्टी व औक्षण करत जवानांचे स्वागत - सीआरपीएफच्या जवानांचे संचलन

येवल्यात सीआरपीएफ जवान आणि पोलिसांनी संचलन केले. यावेळी जवानांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत त्यांचे जवानांचे व पोलिसांचे मनोबल वाढवले.

march of crpf constables
सीआरपीएफ' जवानांचे संचलन
author img

By

Published : May 23, 2020, 11:58 AM IST

Updated : May 23, 2020, 1:34 PM IST

येवला(नाशिक)- कोरोनाच्या व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात केंद्रीय सुरक्षा बल, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचलन केले. नागरिकांनी संचलन करत असलेल्या जवानांवर व पोलिसांवर पुष्पवृष्टी करून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत जवानांचे व पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सीआरपीएफ जवानांचे संचलन

मनमाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे व येवला पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली 'सीआरपीएफ'च्या जवानांनी येवला शहरातील शनिपटांगण, देवी खुंट,आझाद चौक,मेंनरोड, खांबेकर खुंट अशा विविध भागातून संचलन केले. शहरातील अनेक ठिकाणी महिला व तरुणींनी या सर्व जवानांवर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर फुले टाकत औक्षण केले. पोलीस आणि सर्व यंत्रणा टाळेबंदीत करत असलेल्या कामाचे कौतुक नागरिकांनी केले.

मुस्लीम बांधवांनी रमजान ईदला घरातच नमाज पठण करावे व प्रशासनाला मदत करून टाळेबंदीतील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांच्यावतीने येवला शहरात करण्यात आले.

Last Updated : May 23, 2020, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.