नाशिक -शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना येवला तालुक्यातील एका 67 वर्षीय आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बुंदेलपुरा परिसरातील आजोबा हे आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी फटाके फोडत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले.
येवला तालुक्यातील बुंदेलपुरा परिसरातील 67 वर्षीय आजोबांवर गेल्या वीस दिवसांपासून नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. योग्य उपचारानंतर त्यांना आज डिसचार्ज देण्यात आला. याबद्दल माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आजोबांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. यावेळी सर्व नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनदंन केले. परिसरातील चिमुकल्यांनीही फटाके फोडत त्यांचे स्वागत केले. याआधी त्यांच्या पत्नी 2 दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या होत्या. आज त्यांनीही घरी आजोबांचे औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. अशाप्रकारे नागरिकांनी स्वागत केल्याने आजोबांचे डोळे पाणावले होते. आजोबांनी हात जोडून परिसरातील नागरिकांना धन्यवाद देत घरात प्रवेश केला.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात चोवीस तासात 204 कोरोनाबाधित; 7 जणांचा मृत्यू..