नाशिक- जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या ठेवीदारांवर स्वताची किडनी, डोळे विकण्याची वेळ आली आहे. बँकेत झालेल्या अपहारात या ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मात्र, बँक प्रशासनाकडून ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने या ठेवीदारांनी आज (सोमवारी) नाशिकच्या महाराष्ट्र बँकेच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ठेवीदारांनी स्वत:चे अवयव विकान्याचा इशारा दिला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या दाभाडी येथील शाखेत नागरिकांनी आपली रक्कम ठेवलेली होती. मात्र, सदर बँक शाखा ठेवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांनी नाशिकमधील बँक ऑफ महाराष्ट्र समोर गडकरी चौकात आंदोलन केले. यावेळी आमचे पैसे परत करा अन्यथा आम्ही आमच्या किडन्या, डोळे, लिव्हर विक्रीस काढले आहे, असे फलक प्रदर्शित केले.
आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत तरीही बँक पैसे देत नाही. त्यामुळे, आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? बँक आमचेच पैसे आम्हाला देत नसेल तर, आम्ही कुठे जायचे? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला. अनेक नागरिकांच्या या बँकेत ठेवी आहेत. करोडो रुपयांचा हा घोळ आहे. त्यामुळे, बँकेने तात्काळ आमचे पैसे परत करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.
हही वाचा- 'एखाद्या नेत्याची भटगिरी किती करावी याचे भान ठेवायला हवे'