ETV Bharat / state

नाशकातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरीक-पोलीस संवाद कार्यक्रमाचे आयोजन - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी कशी घ्यावी? तसेच आपल्या परिसराची सुरक्षा कशी करता येईल, या संदर्भात पोलीस आयुक्त नांगरे पाटील थेट नागरिकांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे धडे दिले जात आहेत.

नागरिकांशी संवाद साधताना नांगरे पाटील
author img

By

Published : Jul 3, 2019, 6:14 PM IST

नाशिक - शहरात चोऱ्या, घरफोड्या, खून, दरोडे यासारख्या घटनांचे सत्र रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कंबर कसली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून 'नागरिक-पोलीस संवाद' कार्यक्रम घेतला जात आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितेची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नागरिकांशी संवाद साधताना नांगरे पाटील

नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी कशी घ्यावी? तसेच आपल्या परिसराची सुरक्षा कशी करता येईल, या संदर्भात पोलीस आयुक्त नांगरे-पाटील थेट नागरिकांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे धडे दिले जात आहेत. तसेच चोरट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्याबाबत शहराचा आढावा घेण्यात येत आहे.

नागरिक-पोलीस संवाद कार्यक्रमाअंतर्गत सरकारवाडा येथील चोपडा लॉन्स येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस आयुक्तांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यामाध्यमातून त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.

महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या "वॉक विथ कमिशनर" कार्यक्रमाची आठवण -

नाशिकचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी जाऊन घेतल्या होत्या. तसेच त्यांनी नागरिकांनी सांगितलेल्या अडचणी तत्काळ सोडण्यावर भर दिला होता. आता त्यांच्यासारखेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची आठवण झाली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

Intro:गुन्हेगार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील थेट नागरिकांन मध्ये...

Body:नाशिक शहरात चोऱ्या,घरफोड्या,खून,दरोडे यासारख्या घटनांचे सत्र रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कंबर कसली आहे, नागरिकांन मध्ये निर्माण झालेली असुरक्षितेची भावना दूर करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालया कडून शहरातच्या वेगवेगळ्या भागात पोलीस नागरिका संवाद हा कार्यक्रम घेतला जातोय..

ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सूचना आणि त्यावर उपाय योजना केल्या जात आहे,नागरिकांनी आपल्या मालमत्तेची घ्यावयाची काळजी आणि आपल्या परिसराची सुरक्षा कशी करता येईल या संदर्भात पोलिस आयुक्त नागरिकांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहे,महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी चोरट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कशी निर्माण करता येईल यासाठी पोलीस आयुक्त आढावा घेत आहेत,नाशिकच्या सरकारवाडा,गंगापूर पोलीस ठाणे अंतर्गत चोपडा लॉन्स येथे हा उपक्रम घेण्यात आला, यावेळी प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन केल्या नंतर नागरिकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी,सूचना सांगितल्या, शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं हीच भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम घेतला जात आहे,या कार्यक्रमाला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद देत आहे,

महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या "वॉक विथ कमिशनर" यांची नागरिकांना आठवण

नाशिकचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट नागरिकांन मध्ये जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी जाऊन घेत त्या तात्काळ सोडवण्यावर भर दिला होता, त्याच प्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नागरिकांशी संवाद साधत असल्याचे बोलले जात आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.