नाशिक - कोरोनाच्या भीतीने नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील घट झाली आहे. तर, नाशिकहून पुण्याला जाणारे प्रवासी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून स्वतःची काळजी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नाशिकच्या ठक्कर बाजार या एसटी स्थानकावर प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. विशेष म्हणजे रविवारी बस स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता परिवहन महामंडळाकडूनही योग्य त्या उपाययोजना केल्या जात असून या परिसरात स्वच्छता राखली जात आहे. महत्वाच म्हणजे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सॅनिटायझर दिले जाऊन त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते आहे.
हेही वाचा - कोरोनाचा फटका मकेच्या पिकाला, दर घटल्याने शेतकरी चिंतेत
हेही वाचा - कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला, यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद