नाशिक: नोकरीसाठी 7 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर या जॉब फेअरमध्ये कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यासाठी संदीप विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिकला जॉबफेअर अर्थात रोजगार महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या जॉब फेअरसाठी महाराष्ट्रातून सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी: या जॉब फेअरमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन,औषध निर्माण, तसेच पदवी, पदविका, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी - पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या आवारात अनेक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना सेंटर्स उपलब्ध करून देण्यात आले. याच दरम्यान अर्हताप्राप्त उमेदवारांचा लागलीच मुलाखती घेऊन त्यांना नोकरीची संधी देण्यात आली. यावेळी इंजिनिअरिंग, मेकनिकल, कॉम्प्युटर, एमबीए, एमसीए, बीसीए, एअर होस्टेस, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इत्यादी कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.
थेट नियुक्तीपत्र: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा सर्व सुरळीत होत असून कंपन्यांमार्फत युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जॉब फेअर हे सर्वच शहरात व्हायला हवे, ज्यातून कंपन्यांना देखील स्किलफुल विद्यार्थी मिळतील आणि विद्यार्थ्यांना देखील नोकरीची संधी मिळेल असे पारस एअर स्पेसच्या एचआर सुजाता गोराय यांनी सांगितले.
200 हुन अधिक कंपनीच्या सहभाग: कोरोनानंतर आम्ही पहिल्यांदाच जॉब फेअरचे आयोजन केले आहे. यात देशभरातून 200 हुन अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तर 7 हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वच कंपन्यांचे एचआरवयात सहभागी झाले होते. थेट मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देत आले. दरवर्षी यापेक्षा ही मोठ्या प्रमाणात जॉब फेअर घेण्याचा आमचा मानस असल्याचा संदीप झा यांनी सांगितले.
एकाच ठिकाणी नोकरीचे पर्याय उपलब्ध: माझे मागच्या वर्षी शिक्षण पूर्ण झाले आहे. मी नोकरीच्या शोधत होतो. मला जॉब फेअरची माहिती मिळाली, त्यामुळे मी या ठिकाणी आलो असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्यांने आतापर्यंत तीन कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या आहेत. एकाच ठिकाणी मला वेगवेगळ्या कंपनीचा पर्याय मिळाल्याने अशा प्रकारचे जॉब फेअर ठीक ठिकाणी व्हायला हवे जेणेकरून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
हेही वाचा: Nashik Grapes Export नाशिकमधून युरोपियन देशात 25 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात