नाशिक (मनमाड) - आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरू करण्यात आली आहे. पण, इयत्ता आठवीपर्यंत पास करण्याचा निर्मय असताना दोन महिन्यांनासाठी शाळा का सुरू करण्यात येत आहे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मागील महिन्यात 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर आजपासून (दि. 27 जाने.) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. केवळ दोन महिन्यांचा शैक्षणिक वर्ष राहीला असल्याने या निर्णयचा फेरविचार शासनाने करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
संमतीपत्र देण्यास पालकांचा नकार
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासोबतच विद्यार्थ्यांनी पालकांना शाळेत पाठवताना संमती पत्र देणे बंधनकारक आहे. यामुळे अनेक पालक नाराज झाले असून अनेकांनी संमती पत्र देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
हेही वाचा - राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती - छगन भुजबळ