नाशिक - नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आलेल्या शालिमार एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या गाडीला 4 डबे पार्सल असल्याने मनुष्यहानी झाली नाही. मात्र, यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ झाली. आग विजवण्यात आग्निशन दलाला यश आले आहे. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हेड वायर तुटल्याने तूर्तास प्लॅटफॉर्म 3 वरील रेल्वे वाहतूक प्लॅटफॉर्म 1 व 2 चालू असल्याचे, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
कोणतीही जीवित हानी नाही - शालिमार होऊन लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन ला नाशिक रेल्वे स्थानकामध्ये आग लागली. आणि एकच गोंधळ उडाला आणि भीती निर्माण झाली.मात्र प्रशासनाने अग्निशामक दल करवी त्वरित आग विझविण्यासाठी प्रयत्न केले गेले.परिणामी हानी टळली. शालिमार वरून निघालेली लोकमान्य टिळक मुंबईकडे येणारी शालिमार एक्सप्रेस आज सकाळी पावणे आठ वाजता नाशिक रेल्वे स्थानकात आली त्याच वेळेला त्याच रेल्वेतील पार्सलचा जो डबा होता त्या डब्यात धूर दिसू लागला आणि थोड्याच वेळात आगीचे मोठे रूप दिसले त्यानंतर प्रशासनाने तात्काळ अग्निशामन दलाला बोलावले आणि त्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले.
कुठल्याही प्रवाशाला किंवा व्यक्तीला इजा झालेली नाही - अचानक पार्सल डब्याला लागलेल्या आगीमुळे रेल्वे प्रशासन प्रावसी देखील काळजीत पडले होते. मात्र तातडीने रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दल यांनी आग विझवली त्यामुळे कुठल्याही प्रवाशाला किंवा फलाटावरील कुठल्याही व्यक्तीला आगीची इजा झालेली नाही. कोणी जखमी झालेले नाही .मात्र पार्सल डब्यातील काही सामान मात्र जळाले आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासोबत ईटीव्ही भारत व त्याने संवाद साधला असता त्यांनी या घटने संदर्भात माहिती दिली. "सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी नाशिक रेल्वे स्टेशन मध्ये शालीमारून लोकमान्य टिळककडे येणारी जी एक्सप्रेस ट्रेन आहे .नाशिक रेल्वे स्थानकामध्ये आल्यावर फ्लॅट क्रमांक तीनवर त्या ट्रेनमधील पार्सल डब्यामध्ये आग लागली. या आगीवर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले रेल्वे प्रशासनाने देखील सिताफिने ही परिस्थिती हाताळली त्यामुळे कुठल्याही प्रवाशाला किंवा व्यक्तीला इजा झालेली नाही."