नाशिक - पाकिस्तान,उर्दु भाषेतील मोबाईल चॅटिंग डेटा डिलीट करणारा पीएफआयच्या एका सदस्याला अटक. जळगाव मधून मुस्लिम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा ( Muslim Popular Front of India ) आणखी एक सदस्याला एटीएसने ( PFI ) अटक केली आहे. यापूर्वी एटीएसच्या पथकाने 5 जणांना केली आहे अटक ( ATS team has arrested 5 persons ) जनिस उमेर खय्याम पटेल असे ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या सदस्याचे नाव एटीएसने जनिस पटेलला न्यायालयात हजर केले असता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..
मोबाईल चॅटिंग डेटा डिलीट - पीएफआयच्या या आधी पकडलेल्या 5 जणांपैकी दोघांच्या जनिस पटेल या संपर्कात असल्याची माहिती आहे. पाकिस्तान सोबत उर्दु मध्ये होणाऱ्या मोबाईल चॅटिंग डेटा डिलीट करत असल्याचा जनिसवर एटीएसचा आरोप ठेवला आहे. मोबाईल मधील कॉलिंग,चॅटिंग डेटा वॉश अप केल्याचं सरकारी वकील अजय मिसर यांनी माहिती दिली. दिवसेंदिवस पीएफआयची व्याप्ती वाढल्याने एटीएस तपास वाढणार आहे.
या आधी हे अटकेत.. एटीएस पथकाने याआधी पॉप्युलर फ्रंट अँड इंडिया या संघटनेशी संबंध असलेल्या मालेगाव, पुणे, कोल्हापूर, बीड येथील पाच जणांना अटक केली,यात मालेगाव येथून सैफु रहेमान,पुणे येथून अब्दुल कैय्युम शेख,राझी अहमद खान, कोल्हापूर मधून नसीब मुल्ला,तर बीडवरून वसीम शेख यांना अटक करण्यात आली आहे.