नाशिक - पैठणी म्हणलं की काठावर असलेली मोराची किंवा इतर जरतारी नक्षी असलेल्या साड्या महिलांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. पैठणी साडीसाठी नाशिकमधील येवला शहर जगप्रसिद्ध आहे. येवल्यातील पैठणी विणकर सुनील कोकणे यांनी राधा व कृष्णाचे चित्र असलेली पैठणी तयार केली आहे.
यापूर्वी या कारागिराने हरणांचा कळप तसेच विविध चित्रे पैठणी साडीवर तयार केले होते. आता प्रथमच सुनील कोकणे यांनी राधा व कृष्ण पैठणीवर साकारले आहेत. ही पैठणी साडी ते मंदिरात देणार आहेत. कोकणे यांच्या प्रमाणेच अनेक कलाकार आपली कला साड्यांच्या रुपात सादर करतात.