ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: येवल्यातील पैठणी व्यवसायाला कोट्यवधींचा फटका - येवला पैठणी व्यवसाय न्यूज

नाशिक शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेला येवला तालुका हा पैठणी साड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. येवला तालुक्यात 7 हजारांपेक्षा जास्त कुटुंब हातमागावर पैठणी विणण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. आपली खास ओळख असणाऱ्या या पैठणी साडीला जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे.

Paithani Sadi
पैठणी साडी
author img

By

Published : Sep 2, 2020, 3:25 PM IST

नाशिक - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका येवल्याच्या पैठणी व्यवसायालाही बसला आहे. या काळात पैठणी व्यवसायाचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ते लवकर भरून निघणे कठीण असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. पैठणी व्यवसायावर कोरोनाचा कसा परिणाम झाला याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

पैठणी साडी व्यसायाला कोट्यवधीरुपयांचा फटका

नाशिक शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेला येवला तालुका हा पैठणी साड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. येवला तालुक्यात 7 हजारांपेक्षा जास्त कुटुंब हातमागावर पैठणी विणण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. पैठणीवर नक्षीदार कलाकुसर आणि मोराचे नक्षीकाम हे कारागीर करतात. आपली खास ओळख असणाऱ्या या पैठणी साडीला जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होत असते. मात्र, कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे.

गेल्या पाच महिन्यात येवल्यातील पैठणी व्यवसायाला 300 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा फटका बसला आहे. सर्वच व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात पैठणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मात्र, त्या खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे चित्र आहे. एक पैठणी तयार करण्यासाठी कारागिराला 70 तास लागतात. त्यासाठी तो दररोज 10 तास काम करतो व सात दिवसात एक पैठणी तयार करतो. जर एखाद्या पैठणीवर नक्षीकाम जास्त असेल तर त्यासाठी अधिक कालावधी लागतो. येवल्यात हातमागावर तयार केलेल्या 6 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या पैठणी साड्या मिळतात.

पैठणी विणकाम करणाऱ्या कारागिरांवर उपसमारीची वेळ -

येवल्यात 7 हजारांपेक्षा जास्त कुटुंब हातमागावर पैठणी विणण्याचा व्यवसाय करतात. लॉकडाऊनमध्ये या सर्व कारागीरांच्या हाताला काम मिळाले नाही. अनलॉक सुरू होऊन सुद्धा पैठणी व्यवसाय अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही. जी दुकाने सुरू झाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा पैठणीसाठी मागणी होत नसल्याने कारागिरांना कमी तास काम मिळत आहे. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे.

पर्यटक नसल्याने पैठणीला फटका -

येवला तालुका पारंपरिक पैठणीसाठी प्रसिद्ध असल्याने पुणे, मुंबई, दक्षिण भारतासह देशभरातून पर्यटक येथे पैठणी खरेदी करण्यासाठी येतात. तसेच येवल्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डी येथे येणार भाविकही आवर्जून येवल्यात येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे शिर्डीचे आणि त्र्यंबकेश्वराचे मंदिर बंद आहे. याचा फटका पैठणी व्यवसायाला बसला आहे.

लग्न समारंभ रद्द झाल्याने दुकानदारांचे नुकसान -

मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होत असतात. यावर्षी हे चार महिने कोरोना लॉकडाऊनमध्ये गेले. या दरम्यान अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले तर काहींनी 50 जणांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पाडले. याचा परिणाम पैठणी व्यवसायावर होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

ऑललाइन माध्यमातून पैठणीची खरेदी व विक्री -

सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक दूरचा प्रवास करणे टाळत आहेत. यामुळे आता येथील व्यावसायिकांनी इतर शहरातील ग्राहकांसाठी ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांचाही याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक व्हिडिओ कॉलिंगकरून पैठणी पसंत करून विकत घेत आहे. आर्थिक व्यवहारासाठी दुकानदार ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट, फोनपे, पेटीएम, गुगल पे सारखे पर्याय देत आहेत.

राज्य पर्यटन विभागाकडून पैठणीला चालना देण्याची योजना -

येवला मतदारसंघाचे गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नेतृत्व करत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात येवल्याची पैठणी जगभर पोहचावी यासाठी येवला शहरात भव्य येवला पैठणी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी ना नफा ना तोटा या तत्वावर येवल्यातील विणकारांनी तयार केलेल्या पैठण्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याला देखील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच येथे पैठणी क्लस्टर सुरू करण्यात येणार असून त्याचेही बांधकाम पूर्ण झाले आहे. या क्लस्टरमुळे येथील विणकारांना कमी किंमतीत रेशीम, जरी सारखा कच्चामाल आणि नवनवीन नक्षीकामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.