ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रीय; भात लावणीच्या कामाला वेग

author img

By

Published : Jul 12, 2020, 7:38 PM IST

काही दिवस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Paddy Plantation
भात लावणी

नाशिक - जिल्ह्यात जून महिन्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर मात्र, काही दिवस पावसाने दडी मारली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या भागात आता भात लावणीला वेग आला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सक्रीय झाला आहे

काही दिवस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. सध्या काही शेतकरी पेरणी करत आहेत तर काहींची भात लावणी सुरू आहे. आत्तापर्यंत इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 361 मिलीमीटर पाऊस पडला असून शनिवारी दिवसभरात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. असाच पाऊस सातत्याने पडत राहिला तर बळीराजाची कामे लवकर आटोपतील.

भात लावणीच्या कामासाठी मजुरांची मागणी वाढली आहे. यापूर्वी भातलावणी करणाऱ्या एका मजुरासाठी 250 रुपये रोजंदारी दिली जात होती. आता ही रोजंदारी 300 ते 350 रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. चांदवड, मालेगाव, लासलगाव, नांदगाव, येवला येथे आत्तापर्यंत कांद्याची 30 टक्के पेरणी झाली आहे तर याच भागात मक्याची 63 टक्के पेरणी झाली आहे.

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या लहान-मोठ्या 24 धरण प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 33 टक्के पाणीसाठा आहे. 65 हजार 818 दस लक्ष घन फूट इतकी या प्रकल्पांची साठवण क्षमता असून, सद्यस्थितीत 21 हजार 638 इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या धरणांमध्ये नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यातील गोदावरी नदीसह इतर छोट्या उपनद्यांचे पाणी जाते. सध्या फक्त नांदुर मध्यमेश्वर प्रकल्पातून 807 क्युसेक पाण्याचा विसर्ग औरंगाबादमधील जायकवाडी धरणाच्या दिशेने केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.